ऑनलाईन लुडो खेळतांना भारतीय मुलांनी पटवलं पाकिस्तानच्या पोरीला अन् ति भारतात घुसल्यावर उलटचं घडलं

ऑनलाईन लुडो खेळत असताना भारतीय मुलायम सिंहच्या प्रेमात पडलेली 15 वर्षीय पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानीला रविवारी पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे.BASF च्या जवानांनी इकराला अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर पाक रेंजर्सच्या ताब्यात दिले.जेव्हा इकरा पाकिस्तानातील तिच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ती केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या निशाण्यावर आली.

केंद्रीय यंत्रणांनी कर्नाटक गुप्तचर यंत्रणांना सावध केलं.ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा पोलिसांना संशय होता,पण तपासानंतर भारत सरकारने तिला पाकिस्तानात परत पाठवण्याचा निर्णय घेतला.

भारतात बनावट ओळख करून राहणारी पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानी आणि तिचा बाॅयफ्रेंड 25 वर्षीय मुलायम सिंह यादव यांना जानेवारीत बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली होती.दोघेही बराच वेळ ऑनलाईन लुडो खेळत असत,याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.

मुलायमने तिला मागच्या वर्षी नेपाळला बोलावले होते,जिथे त्यांचे लग्न झाले होते.बिहारमधील बीरगंजला जाण्यासाठी हे जोडपे भारतात आले आणि तेथुन पटना गाठले.यादव आणि इकरा नंतर बंगळुरूला गेले आणि जुनर येथे भाड्याच्या घरात राहु लागले.

जिथे यादवने ऑक्टोबर 2022 पासुन सुरक्षा रक्षक म्हणुन काम करण्यास सुरुवात केली.रिपोर्टनुसार,इकराचे नाव बदलुन रवा यादव असे केल्यानंतर मुलायमने तिचे आधार कार्ड घेतले आणि भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला.

एका हिंदु मुलीला त्यांच्या घरात नमाज करताना पाहुन मुलायमच्या शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.यानंतर मुलायमच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.इकरा आणि तिचा पाकिस्तानी पासपोर्ट जप्त केला.इकराला बंगळुरू पोलिसांनी अटक केलं आणि अटारी सीमेवरून पाकिस्तानात परत पाठवण्यासाठी अमृतसरला आणल्याची माहिती मिळाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *