औरंगाबादमध्ये आपल्या ४३ वर्षाच्या बायकोला घरी शिक्षकासोबत एकट पाहिलं अन् मिनीटातचं जे घडलं…

औरंगाबाद : राग अनावर झाल्यावर माणुस काहीही करु शकतो याचा प्रत्यय सिल्लोड शहरात आला.आपल्या अनुपस्थितीत मित्र घरी आल्याचे पाहताच बायकोसोबत अनैतिक संबंध असतील या संशयातुन एकाने मित्राची हत्या केली.हि घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील आनंद पार्कमध्ये घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव फारुकखान इब्राहिमखान पठाण(वय ४८) असे आहे.तर त्याचा खुन करणाऱ्या मुख्य आरोपी शामधन बैनाडे(वय ४५) हा आहे.पोलिसांनी बैनाडेची पत्नी गीता शामधन बैनाडे(वय ४३) व इतर एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,मृत फारुख याचा उदय उर्फ मुन्ना कूळकर्णी हा मित्र आहे.

मुन्ना मार्फत आनंद पार्क येथे राहणारी गीता शामधन बैनाडेहिच्या सोबत फारुखची मैत्री झाली होती.२४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता फारुख हा गीताला भेटण्यास तिच्या घऱी आनंदपार्क येथे गेला होता.दरम्यान,पुढे ८:३० वाजेच्या सुमारास अचानक गीताचा पती शामधन घरी आला.फारुखला बायकोसोबत घरात पाहुन त्याचा राग अनावर झाला.बायकोसोबत फारुखचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आल्याने पतीने ट्रकमधील लोखंडी रॉड काढुन फारुखच्या डोक्यात जोर्यात घातला.

यात फारुखनी जागीचं जीव सोडला.त्यानंतर शामधन तेथुन पसार झाला.या दरम्यान मुन्ना कुलकर्णीचा फारुखच्या फोनवर काॅल आला.तो फोन गीताने उचलला.तिने त्याला
सगळी हकीगत सांगितली.मुन्नाने घरी गाठतं तात्काळ फारुखला सिल्लोड येथील रुग्णालयात नेले.येथे तपासुन डॉक्टरांनी फारुखला मृत जाहीर केले.

अपघात झाल्याचा केला बनाव..
फारुख आणि गीता एकमेकांना ओळखत होते.फारुख हा गीताला भेटण्यास तिच्या घरी गेला होता.पतीच्या हल्ल्यात फारुखचा मृत्यू झाला.आता आपण फसु असे वाटल्याने गीताने फारुखचा दुचाकीवर अपघात झाल्याचे सांगितले.मात्र,पोलिसांना संशय आल्यावर उलटतपासणी केली अन् गीताने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत शिक्षक तर आरोपी ट्रक चालक
मयत फारुख पठाण हा अंधारी येथील एका शाळेत शिक्षकाची नौकरी करायचा.तो सिल्लोड येथील अंबादास नगरमध्ये राहत होता.तर आरोपी शामधन बैनाडे हा ट्रक चालक असुन फारुख व त्याची जबरदस्त मैत्री होती.मृत फारुखचे वडीलांच्या तक्रारीवरून शामधन बैनाडे,गीता शामधन बैनाडे आणि अनोळखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.खुन करून आरोपी रात्री पसार होणार होता.मात्र पोलिसांनी सापळा रचुन त्याला डोंगरगाव फाट्यावर गुरुवारी रात्री ११ वाजता अवघ्या २ तासांच्या आत अटक केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *