संभाजीनगरमध्ये दहावीच्या मुलानं वर्गातल्या प्रियसीला मोबाईल दिला, बोलणं व्हायचं पण गव्हाच्या शेतात भयंकर झालं

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातुन मुलीच्या नातेवाईकांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना वैजापुर तालुक्यातील भिवगाव येथे घडली आहे.मंगळवारी सकाळी मुलाच्या हत्येची घटना उघडकीस आली.मृत मुलगा हा 25 फेब्रुवारी पहाटेपासुन घरातून बेपत्ता होता.वडील प्रभाकर नारायण काळे यांनी मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती.

मृत मुलगा हा विनायक नगर येथील शाळेत इयत्ता दहावीचं शिक्षण घेत होता.याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.दादासाहेब माधवराव जंगले,माधवराव कारभारी जंगले आणि सुनील माधवराव जंगले अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

वर्गातील मुलीसोबत प्रेमसंबंध
मृताचे वर्गातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते.त्यांचा प्रेमप्रकरणाबद्दल गावात अनेक जणांना माहीत होते.त्याने प्रियसीला मोबाईल देखील घेऊन दिला होता.ज्यावरुन ते एकमेकांच्या संपर्कात राहत होते.४ दिवसापासुन बेपत्ता मुलाचा शोध घऱचे घेत होते.मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.अखेर मंगळवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत त्याची बाॅडीचं सापडली.

शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
वैजापुर तालुक्यातील भिवगाव भास्कर माधव गायके यांच्या गव्हाच्या पिकाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मुलाची बाॅडी सापडली.मृतदेह अपहरण झालेल्या मुलाचा असल्याची खात्री पटली.ही बाॅडी मुलीच्या घरापासुन हाकेच्या अंतरावर पडलेली होती.तसेच मृतदेहावर पोलिसांना काही जखमाही आढळुन आल्या आहेत.

हत्येप्रकरणी चौघे ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी या प्रकरणात सदर मुलीचे आई-वडील,काका आणि आजोबा या ४ जणांना ताब्यात घेतले.त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *