कसं रेरे! वहिनीसोबत लफड नाही हे सिध्द करण्यासाठी भोळ्या दिराची अग्निपरीक्षा, मजेशीर व्हिडीओ

हैदराबाद : तेलंगणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका व्यक्तीला आपल्या भावाच्या बायकोसोबत अनैतिक संबंध नाहीत हे सिद्ध करण्यासाठी अग्निपरिक्षा द्यावी लागली आहे. भावाने गावाच्या पंचायतीत त्याची तक्रार केल्यानंतर पंचायतीने त्याचा अग्निपरिक्षा करायला लावल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील बंजारूपल्ली या गावामध्ये हा प्रकार घडला आहे. अग्निपरिक्षेसाठी त्याला लोखंडी सळई धगधगत्या विस्तावातून बाहेर काढावी लागली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सदरा काढून विस्तवातील गरम झालेली लोखंडी सळई हाताने बाहेर काढताना दिसत आहे. तर या अग्निपरिक्षेनंतरही गावकरी समाधानी नसल्याची माहिती आहे.

गावकऱ्यांनी अग्निपरिक्षेनंतरही त्याला त्याची चूक मान्य करण्यास भाग पाडले असून सदर पीडित व्यक्तीने यानंतर पोलिसांकडे धाव घेतल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Trolls Officials (@trolls_official)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *