कायम विजयाचा गुलाला अंगावर, बिनजोड शर्यतीचा बादशहा ‘शिवा’ बैलाचा मृत्यू; कुटुंबाचा टाहो
छत्रपती संभाजीनगर : बैलगाडा शर्यतीमध्ये प्रत्येक ठिकाणी विजयी गुलाल उधळणारा आणि बैलगाडा शर्यतीतील बिनजोड शर्यतीचा बादशहा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव या ठिकाणच्या ‘शिवा’ बैलाचा लम्पी या आजाराने मृत्यू झाला. तब्बल नऊ लाख रुपये किमतीच्या बैलगाडा शर्यतीचा बादशहा कायम गुलालात राहणाऱ्या गुणी बैलाचा लम्पी आजाराने मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव घोडेगाव येथील श्रीराम मदगे या शेतकऱ्याने १७ जानेवारी २०२२ रोजी गावा शेजारील कात्राबाद येथून व्यापाऱ्याकडून खिल्लारी जातीचा ‘शिवा’ नावाचा बैल खरेदी केला होता. त्यावेळेला या बैलाची किंमत २४ हजार रुपये होती, तेव्हा त्याचे वय बारा महिने होते. दोन-तीन महिन्यानंतर त्याचा घरातील राजा नावाच्या बैलासोबत सराव घेतला. त्यानंतर त्याला दूध, काजू, बदाम आणि उडदाची डाळ इत्यादी खाद्यपदार्थ त्याला सुरू केले. मदगे परिवार त्याचा लहान मुलाप्रमाणे सांभाळ करत होते.
बैलांच्या शर्यतीमध्ये आणि शंकरपटमध्ये शिवाला उतरवलं होतं. बैलगाडी सर्वात मोठा आम्ही वडकी येथील भारत केसरी खेळण्यासाठी उतरवलं होतं. मात्र, आजपर्यंत शिवा बैलाने आजपर्यंत कधीच विनागुलालाचा राहिला नाही. बिन जोड शर्यतीमध्ये बिनजोड शर्यतीचा बादशाह म्हणून ‘शिवा’ या बैलाची ओळख होती. आतापर्यंत त्यांनी बारा बिनजोड शर्यती खेळामध्ये एकामध्ये त्याला पराभव करावा लागला नाही. प्रत्येक याच्यामध्ये तो विजय झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याची नऊ लाख रुपये किमतीमध्ये मागणी झाली होती, असं कुटुंबियांनी यावेळी सांगितलं.
शिवाला शर्यतीसाठी उतरवलं त्यावेळेस तो कमकुवत असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्याला आजार असल्याचे लक्षात आले, तो बारा दिवस आजारी होता. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांना उपचारांमध्ये यश आलं नाही. ‘शिवा’ बैलाचा मृत्यू झाला. मुलाप्रमाणे सांभाळलेल्या बैलाचा मृत्यू झाल्यामुळे मदगे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बैलाला शेतामध्ये अंत्यविधी करण्यात आले तेव्हा कुटुंबीयांनी अक्षरशा टाहो फोडला होता.
शिवा हा बैल स्वभावाने खूप शांत होता. घरातील लहान मुलं, आई-वडील कुणालाही तो त्रास देत नव्हता. आतापर्यंत आम्ही अनेक शर्यतीचे बैल आणले. मात्र, हा बैल सर्वात शांत आणि गुणी बैल होता, असं बैलाचे मालक ऋषिकेश पाटील यांनी यावेळी सांगितलं.