काय चुकलं होत ज्ञानदाचं? दुपारी झोपली अन् तासाभरात घरच्यांना तिची फक्त बाॅडी सापडली
सोलापुर : सोलापूर जिल्ह्यातुन एक भयंकर घटना समोर आली आहे.आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करण्यासाठी दोन भावांमध्ये वादविवाद झाला.हा वाद इतका विकोपाला गेला की क्रुर काकाने आपल्या सख्या पुतणीची हत्या केली.हत्येनंतर त्याने मृतदेह सीना नदीत फेकला.या संतापजनक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात हि संतापजनक घटना घडली आहे.ज्ञानदा यशोधन धावणे(वय ४ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचं नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.माहितीनुसार,मोहोळ तालुक्यातील डिकसळ इथला रहिवासी असलेल्या यशोधन शिवाजी धावणे यांची वडीलोपार्जित सोळा एकर शेतजमीन आहे.
यातील ५ एकर जमीन हि त्यांच्या नावे आणि ५ एकर भाऊ यशोदीप यांच्या नावावर आहे.तर उर्वरित ६ एकर जमीन ही आईच्या नावे आहे.फिर्यादी यशोधन धावणे यांनी दिलेल्या जबाबानुसार आईच्या नावावर असलेली ६ एकर शेतजमीन हि आपल्या नावावर करुन द्यावी यासाठी भाऊ यशोदीप हा सातत्याने भांडण करत होता.गावातील लोकांनी बैठक घेत त्याची समजुत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.मात्र तरीही त्यांच्यात वाद सुरूचं होता.दरम्यान,सोमवारी पुन्हा यशोदीप आणि यशोधन या दोन्ही भावात वाद झाला.आज तुमचा फैसलाच करतो असे म्हणत यशोदीपने यशोधनला शिवीगाळ केली.तसेच तुमचा वंश संपवतो अशी धमकीही दिली.
दरम्यान,गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मध्यस्थी करत त्यांचे भांडण मिटवले.त्यानंतर यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले असतांना चिमुकली ज्ञानदा घरी होती.काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी ज्ञानदा आणि वडील शिवाजी हे दोघे घरात दिसुन आले नाही.त्यामुळे त्यांनी वडीलांना फोन केला असता मी मंदिरात दर्शनासाठी आलो असुन ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचं सांगितलं.
मात्र,ज्ञानदा घरात नसल्याने त्यांनी आसपास शोधाशोध केली असता भाऊ यशोदीपने तिला गाडीवर नेल्याचे काही जणांनी सांगितलं.यावेळी यशोदीपला फोन लावल्यानंतर मी तुझ्या पोरीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकुन दिलं असं सांगितलं.याप्रकरणी यशोधन यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भाऊ यशोदीप याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.