काय नालायक बाई आहे, थोडी तरी लाज-लज्जा नाही का? महिलेनी कुत्र्याला लिफ्टमध्ये नेऊन केलं धक्कादायक कृत्य

Viral Video: गुरुग्राम येथील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये एक महिला कुत्र्याला मारतानाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. नव्या माहितीनुसार या क्रूर महिलेकडून दोन पाळीव कुत्र्यांची सुटका करण्यात आली, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. धक्कादायक व्हिडिओमध्ये एका घरात मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलेने पाळीव कुत्र्यांसह बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. नंतर, तिने त्यातील एकाला हवेत खेळवण्यासाठी उचलले आणि तितक्यात त्याला जोरात जमिनीवर आदळले.

पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) या प्राणी कल्याणकारी संस्थेच्या स्वयंसेवकांनी केलेल्या तक्रारीनंतर कुत्र्यांची सुटका करण्यात आली. पीएफएने इंस्टाग्रामवर लिहिले की, “लिफ्टमध्ये वारंवार पिल्लाला मारल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ मिळाल्यानंतर, आमच्या कार्यालयाने तक्रारीवर (sic) तत्काळ कारवाई केली.”

पीटीआयने दिलेल्या वृत्तात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर १०९ मध्ये एका पिता-पुत्र जोडीने परदेशी जातीचे दोन कुत्रे पाळले होते, ज्यांचे पालनपोषण घरगुती मदतनीस करत होते. बुधवारी, ही महिला कुत्र्यांना सोसायटीच्या उद्यानात घेऊन गेली होती आणि फ्लॅटवर परतत असताना तिने लिफ्टच्या दारावर कुत्र्याला तीन वेळा आदळून मारले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अहवालात म्हटल्यानुसार, कुत्र्याने तिला चावण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा स्वतःच्या बचावासाठी तिने त्या कुत्र्यांना बाजूला करताना आदळले असे म्हंटले आहे. सोसायटीच्या रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनने (आरडब्ल्यूए) या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.

पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) एनजीओने या प्रकरणावर अपडेट देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. त्यांनी मदतीसाठी स्वयंसेवक आणि बजघेरा, गुडगाव पीएस यांचे आभार मानले आणि दोन पाळीव प्राणी (बुझो – द पग आणि डॉलर – बीगल) आता सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात आहेत हे सुद्धा सांगितले. दरम्यान या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *