काय सांगता! १०० रुपयांत झाला १२ कोटींचा मालक; एका निर्णयानी रिक्षाचालक झाला अचानक मालामालं
‘देने वाला जब भी देता है, छप्पर फाड के देता है’ ही म्हण आजवर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. एखादा व्यक्ती कुठलीही अपेक्षा नसताना रातोरात श्रीमंत झाला की आपण त्याच्यासाठी या म्हणीचा वापर करतो. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये राहणाऱ्या एका गरीब व्यक्तीसोबत घडला. हा व्यक्ती एक रिक्षाचालक आहे. अन् त्याचं आयुष्य एका रात्रीत असं बदलेल अशी अपेक्षा त्याला देखील नव्हती.
केरळमधील मराडू येथे राहणाऱ्या एका रिक्षाचालकाला तब्बल १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. या लॉटरीमुळे ते कुटुंब सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे.समोर आलेल्या माहितीनुसार या रिक्षा चालकाचं नाव जयपानल पी आर असं आहे. अलिकडेच त्याने १२ कोटी रुपयांनी लॉटरी काढली होती. या तिकिटाची किंमत १०० रुपये होती.
ओणमच्या दुसऱ्या दिवशी या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला. विजयी तिकीटाचा नंबर टी ६४५४६५ होता. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालन यांनी सांगितलं, की त्यांनी १० सप्टेंबरला त्रिपुनितुरा इथून हे लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. मात्र, नंतर त्यांना माहिती मिळाली की त्यांचा नंबरच फॅन्स नंबर आहे.
केरळ राज्य लॉटरी संचालनालयाचं दिलेल्या माहितीनुसार राज्यभर विकल्या गेलेल्या ५४ लाख लॉटरीच्या तिकिटांसाठी ओणम बंपर लॉटरीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पण, जयपालनला पूर्ण १२ कोटी मिळणार नाहीत. या १२ कोटी रुपयांमधून कर भरल्यानंतर त्यांना फक्त ७ कोटी रुपये मिळू शकतील. परंतु एका रिक्षा चालकासाठी सात कोटी रुपयांची रक्कम देखील कमी नाही. रातोरात कोट्यधीश होणारा रिक्षाचालक म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.