काय सांगता! ३ लेकरांच्या आईसाठी संभाजीनगरमध्ये अख्ख गाव बंद ; पतीला गावकर्यांनीही दिली साथ

Sambhajinagar News : संभाजीनगरमधून एका विचित्र घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एखाद्या घटनेच्या निषेधात, राजकारण्यांनी दिलेली बंदची हाक किंवा एखाद्या घटनेकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याची बंदची हाक दिली जाते. पण संभाजी नगर म्हणजेच औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यातील गोंदेगावतील एका नवऱ्याने बेपत्ता पत्नीच्या शोधासाठी गाव बंदची हाक दिली. विशेष म्हणजे या व्यक्तीला गावकऱ्यांनी साथ देत गाव बंदही केलं. (mother of 3 children ran away with a 2 year old boy wife missing husband called a village shutdown sambhajinagar news)

काय आहे नेमकं प्रकरण ?
झालं असं की, 27 वर्षीय आणि तीन मुलांची आई गावातील सलमान शेख शकील या 25 वर्षीय तरुणासोबत पळून गेली. मात्र पतीच्या तक्रारीनुसार सलमानने तिला फूस लावून पळलं असून पोलिसांनी तिचा शोध घ्यावा. महिला हिंदू तर तरुण मुस्लिम असल्याने त्याने माझ्या बायकोचं अपहरण केल्याचं नवऱ्याचं म्हणं आहे. नवऱ्याचं असंही म्हणं आहे की, त्याने माझ्या बायकोचं जबरदस्तीने धर्मांतर करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पोलिसांनी तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन जलद तपास करावा, अशी मागणी त्या व्यक्तीने केली आहे. दुसरीकडे माझ्या पत्नीचं अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या कुटुंबाचा शोघ घेऊन गुन्हा दाखल करा, अन्यथा गाव बंद करेल असा इशारा या पीडित पतीने पोलिसांना दिला. विशेष म्हणजे याचा या गावकऱ्यांनी समर्थन देते गोंदे गावात कडकडीत बंद पाळल्याचंही चित्र दिसून आलं.

महिला 11 जुलैपासून घरातून गायब आहे, असं पतीने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतल्यानंतर तिचा पत्ता लागला नाही म्हणून त्यांनी 12 जुलैला महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. या गाव बंदानंतर जर अजूनही महिलेचा पत्ता लागला नाही तर ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलेच्या पतीने दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *