काल जन्मलेलं बाळ आणि आज आईनेही मिटले डोळे; दुख:द घटनेमुळं गावातील एकाही घरात चुल पेटली नाही

जळगाव : लग्नानंतर ती घरात आली,नवर्याची हलाखीची परिस्थिती,त्यामुळे त्याच्या खांद्याला खांदा लावुन कष्ट केले.व्यवसाय उभारत गावात ओळख निर्माण केली.कष्टाचे दिवस संपुन आनंदाचे दिवस आले आणि घरात पाळणा हलणार म्हणुन घरात प्रचंड आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने क्रुर डाव खेळला.

प्रसुतीसाठी तिला हाॅस्पिटलमध्ये हलवले,बाळ जन्माला आले पण जन्मानंतर अवघ्या २ तासातच बाळाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी आईचाही अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावात मंगळवारी हि ह्रदयद्रावक घटना घडलीय.घटनेने संपुर्ण गाव हळहळले आणि त्यादिवशी गावातील एकाही घरात चुल पेटली नाही.जागृती अनिल कोळी(वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पाडळसरे गावात अनिल कोळी हे पत्नी जागृती कोळी हिच्यासोबत राहत होते.२ वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला.गर्भवती असलेल्या जागृतीला सोमवारी प्रसवकळा सुरु झाल्या.पतीने तिला तातडीने खाजगी वाहनातुन अमळनेर तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले,मात्र जागृतीची प्रकृती बिकट असल्याने त्यांनी अमळनेर येथील रुग्णालयात हलविण्यास सांगितलं.

याठिकाणी मंगळवारी दुपारी ४ वाजता जागृतीची प्रसुती झाली.मात्र जागृतीने बाळाचा चेहरा पाहण्यापुर्वीच म्हणजे अवघ्या २ तासात बाळाचा मृत्यू झाला.२ दिवसांपासुन जागृती जगण्यासाठी धडपड करत होती,मात्र शेवटी हि झुंज संपली.उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अतिरक्तस्त्रावाने जागृतीनी प्राण सोडले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *