‘काळजी घे गं पोरी’ ,आई शेवटची म्हणाली, बुलढाण्यात एका आईची निघाली अंत्ययात्रा; गाव शोकसागरात बुडालं

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दुचाकी चालवताना मागच्या सीटवर बसलेल्या विवाहितेचा स्पीड ब्रेकवरुन खाली पडून गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना खामगाव नांदुरा मार्गावरील परदेशी ढाबाजवळील पुलाजवळ घडली.

खामगाव येथील चांदमारी भागातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी शशिकांत शर्मा हे पत्नी सरिता यांच्यासह १४ नोव्हेंबर रोजी नांदुरा येथून मुलीची भेट घेऊन दुचाकीने खामगावकडे परत येत होते. नांदुरा रोडवरील परदेशी धाब्याजवळील नवीन पुलाजवळ स्पीड ब्रेकवरुन सदर दुचाकी पडल्याने मागच्या सीटवर बसलेल्या सरिता शशिकांत शर्मा (वय ५३) वर्ष या दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला खंबीर दुखापत झाल्याने तातडीने त्यांना खामगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारअर्थी भरती केले.

तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सविता शर्मा यांच्या अपघाती निधनामुळे चांदमारी भागात व त्यांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा नातू असा परिवार आहे.

एकीकडे रस्ते गुळगुळीत झाल्याने दळणवळण सुसाट झाले आहे. त्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे स्पीड ब्रेकर यामुळे अनेक अपघातांच्या घटना समोर येताना दिसून येतात. वाहन चालवताना सावकाश वाहन चालवावे असे रस्ते दिशादर्शक फलकांवर दाखवलेलं असतं. तरीही त्याचं उल्लंघन होतं. वेगावर नियंत्रण ठेवल्यास अशा गंभीर दुर्घटना टाळता येतील, असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *