काही दिवसांपुर्वी ‘ते’ घडलं, कुंटुबिय मदिरात जाताचं छातीवर गोळ्या झाडत मरणाला कवटाळलं

अमरावती: आज संपूर्ण देश भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना पाहण्यात व्यस्त असतानाच अमरावतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. अमरावती शहरातील एका मिठाई व्यापाऱ्याने स्वतःच्या छातीवर बंदुकीचे राऊंड फायर करत आपली जीवन यात्रा संपवल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरातील महेश नगर परिसरातील प्रसिद्ध मिठाई व्यापारी अशोक होशियारसिंग शर्मा यांनी आज रात्रीच्या सुमारास आपल्या छातीवर गोळ्या झाडत आत्महत्या केली. आज एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त कुटुंबीय मंदिरात गेले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी अशोक शर्मा यांना सुद्धा मंदिरात चालण्याचा आग्रह केला मात्र, त्यांनी त्यावर नकार दिला.

कुटुंबीय मंदिरात गेले असता घरातील एकांत साधत त्यांनी बंदुकीने गोळ्या झाडत आत्महत्या केली. काही क्षणातच ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. या ठिकाणी अमरावतीचे पोलीस आयुक्त उपायुक्त राजापेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली

अशोक शर्मा यांचे काही दिवसांपूर्वी पायाचे ऑपरेशन झाले होते. या ऑपरेशनमध्ये त्यांच्या पायात स्टीलची प्लेट टाकण्यात आली होती. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून सातत्याने त्रस्त होते. आज कुटुंबीय मंदिरात गेले असताना त्यांनी अचानक हे टोकाचे पाऊल उचलल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *