काॅल आल्यावर/करतांना ‘हि’ छोटीशी चुक,होईल मोबाईलचा स्फोट; १६ वर्षाच्या मुलाचा मोबाईल स्फोटात मृत्यू

आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईलचा वापर आपल्या आयुष्यातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात होत आहे. बातम्या वाचणे, रिचार्ज करणे, रिमोट म्हणून वापरणे, अचानक लाईट गेल्यावर टॉर्च लावणे, गुगलवर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे किंवा YouTube व्लॉग पाहणे असो. अशी अनेक कामे आहेत जी मोबाईलवर झटपट करता येतात. असं असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या बदायूंतील 16 वर्षीय मुलासोबत जे घडले त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मोठ्या बँडचा मोबाईल चार्जिंगला होता आणि तो मुलगा फोनवर बोलत होता. सोमवारी रात्री अचानक विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. बिसौली येथील रहिवासी सत्यम शर्मा याने स्मार्टवॉच घातले होते आणि त्याचा फोन चार्ज होत असताना फोन वाजला आणि बोलत असताना स्फोट झाला.

सत्यमच्या कुटुंबीयांनी दावा केला की, कॉल येताच मुलाला विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर पडला. आई-वडिलांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिसौलीचे एसएचओ संजीव शुक्ला म्हणाले, ‘प्राथमिक तपासात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी तक्रार केल्यास आवश्यक ती कारवाई करू.

सत्यमने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्याला फोन घेण्यासाठी पैसे दिले होते. सत्यमला मोठ्या ब्रँडचे महागडे फोन आवडायचे. त्याने 20,000 मध्ये फोन आणि स्मार्टवॉच विकत घेतला. सोमवारी त्याच्या फोनची बॅटरी संपली आणि त्याने तो चार्जिंगसाठी ठेवला होता. त्याच दरम्यान ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *