किती हे प्रेम! मुंबईत प्रसिध्द इन्फ्लुएन्सरने बाॅयफ्रेंडसाठी कापली जीभ, म्हणाली-किस करतांनी त्याला…

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से देखील सातत्याने समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.मुंबईतील एका 22 वर्षीय फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने प्रेमापोटी भयंकर कृत्य केलं आहे. तिने भलताच दावा केला असून ती सध्या व्हायरल होत आहे.

बॉयफ्रेंडला Kiss करताना अडचण यायची म्हणून गर्लफ्रेंडने जिभेचा एक भाग कापल्याची घटना समोर आली आहे.झी २४ तासच्या प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 22 वर्षीय सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आणि टिक टोकर रिना रस्तोगीने तिच्या चाहत्याशी बोलताना एक विचित्र किस्सा शेअर केला आहे.

ज्यामध्ये तिने सांगितले की जेव्हा ती तिच्या प्रियकराला किस करायची तेव्हा तिला अडचण यायची. नीट किस करता येत नसल्याने तिला खूप वाईट वाटायचं. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तिने आपल्या जिभेची शस्त्रक्रिया करून लिंगुअल फ्रेन्युलम, जीभेखाली असलेला पडदा काढून टाकला आहे.

भयंकर घटना ऐकल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.रिनाच्या म्हणण्यानुसार, नीट किस करू न शकल्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होत चालला होता आणि तिच्या नजरेत तिचा आत्मसन्मान कमी होत होता. ही बाब लक्षात घेऊन मुलीने आपल्या जिभेचा काही भाग कापण्याचा निर्णय घेतला होता. काही जण याला प्रेम म्हणतील पण अनेकांसाठी हा वेडेपणा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *