केकसाठी पैसे नाहीत! भावाच्या वाढदिवसाला मोठ्या भावाने भाकरीवर लावली मेणबत्ती… भावूक करणारा Video

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ (Viral Video) शेअर होत असतात. काही व्हिडिओ हसवतात, तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. पण काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावूक (Emotional Video) झाले आहेत. आतापर्यंत 9 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तितक्याच लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ
वाढदिवसानिमित्ताने (Birthday) आपण वेगवेगळ्या फ्लेवर्सचे महागडे केक (Birthday Cake) मागवतो. केक कापल्यानंतर आपण तो एकमेकांच्या तोंडालाही फासतो. हजारो रुपये खर्चून आणलेला केक न खाताच फुकट घालवतो. कारण आपल्याला पैशांची किंमत नसते. पण समाजात एक वर्ग असाही आहे ज्यांना महागडे केक तर दूरच केकचा तुकडाही बघायला मिळत नाही. वाढदिवसाला असे महागडे केक कापणं त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नसेल.

सध्या असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैशांशिवायही आनंद साजरा करता येतो हे या व्हिडिओतून पाहिला मिळतं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन लहान मुलं दिसतायत. त्यातल्या मोठ्या मुलाच्या हातात एक भाकरी आहे. भाकरीवर दोन पेटत्या मेणबत्त्या लावण्यात आल्या आहेत. भाकरीवर एक पातळ पदार्थही दिसत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या लहान मुलाचा वाढदिवस आहे.

त्याच्या वाढदिवसाला केक आणण्यासाठी पैसे नसल्याने मोठ्या भावाने भाकरीचाच केक बनवला आहे. ही भाकरी लहान भावासमोर धरत मोठा भाऊ त्याच्यासाठी वाढदिवसाचं गाणं म्हणताना दिसत आहे. हॅप्पी बर्थ टू यू भाई, असं प्रेमाने तो आपल्या भावासाठी गाणं गातोय. आपल्या लहान भावावर मोठ्या भावाचं खूप प्रेम असल्याचं या व्हिडिओतून दिसतंय.

व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावूक
हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहेत. आतापर्यंत 9 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओने नेटिझन्सना भावूक केलं आहे. व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू तरळल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून एका युजरने म्हटलं आहे जे केक वाया घालवतात त्यांनी हा व्हिडिओ एकदा पाहाव. तर एका युजरने या मुलांना भेटू शकतो का? असं विचारलं आहे. अनेक युजर्सने ही मुलं कोण आहेत, आपण त्यांना मदत करु शकतो का असं विचारलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himal Raule (@photo_gram143)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *