कोचिंग क्लासच्या शिक्षकासोबत विद्यार्थींनीचं पळून जाऊन लग्न अन् घरच्यांना ‘ तसला ‘ व्हिडीओ पाठवून म्हणाली ..

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आलेले असून एका तरुणीने कोचिंग क्लासमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकासोबत लग्न केलेले आहे. बिहार मधील बेतिया येथील हे प्रकरण असून लग्नानंतर या तरुणीने एक व्हिडिओ जारी केलेला असून त्यामध्ये ‘ मला किंवा माझ्या सासरच्या लोकांना एक ओरखडा जरी आला तरी मी आई-वडिलांना सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाईल ‘ असे म्हटलेले आहे.

बेतिया येथील सिरसिया ओपी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीने कोचिंग शिक्षक कोचिंग क्लास शिकवणारे शिक्षक यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. १२ तारखे रोजी दोघेही घरात तुम्ही पळून गेले आणि त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले. 15 ला मुलीच्या घरच्यांनी या प्रकाराची पोलिसात खबर दिली आणि या शिक्षकांच्या विरोधात मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .

आपल्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे हे लक्षात येताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला असून त्यामध्ये मला आणि माझ्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना एक ओरखडा जरी आला तरी मी आई वडील आणि मामाच्या कुटुंबाला सोडणार नाही. त्यांच्या विरोधात मी एफ आय आर नोंदवणार असून गरज पडली तर उच्च न्यायालय काय पण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची देखील तयारी आहे असे म्हणत मी किती हट्टी आहे हे माझ्या आई-वडिलांना चांगलेच माहित आहे असे देखील ठणकावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासरचे सर्व व्यक्ती सध्या फरार झालेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *