‘कोमल अन् तिच्या आईला अटक करा’ ,शिक्षकांना भेटुन सरांनी डोंगरावरील झाडाला घेतला गळफास

बीड : सुसाईड नोटमध्ये पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्यांची नावे लिहिली. त्यानंतर हीच नोट व्हाॅट्सअपला स्टेटस ठेवून गळफास घेत शिक्षकाने जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणात ब्लॅकमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते.

अंकुश रामभाऊ पवार (वय ३३ रा.अंथरवण पिंपरी ह.मु.उत्तमनगर बीड) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते गावातीलच आश्रम शाळेवर शिक्षक होते. त्यांना बीडमधील अमित अनवणे, कोमल अनवणे, कोमलचे भाऊ दत्ता गायकवाड व आकाश गायकवाड आणि त्यांची आई यांनी दहा लाख रूपये दे असे म्हणत त्रास देत होते. या आगोदर पाच लाख रूपये कोमलला दिलेही होती. परंतू तरीही पवार यांचा जाच कमी झाला नाही.

याच जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असून आपल्या मृत्यूस हे लोक कारणीभूत आहेत, अशी चिठ्ठी लिहीली. नंतर हीच चिठ्ठी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार इतर लोकांनी पाहताच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला. दरम्यान, चिठ्ठीत नाव असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते जिल्हा रूग्णालयातच ठाण मांडून होते. तर काही नातेवाईक पोलिस अधीक्षक कार्यालयात बसल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिपर्यंत याची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सकाळी शाळेत लावली हजेरी
अंंकुश पवार हे बुधवारी सकाळी आश्रम शाळेत गेले होते. तेथे इतर शिक्षकांसह मुलांना भेटून ते गायब झाले. शाळेतच चिठ्ठी लिहून ते परिसरातील एका डोंगराव गेले. सकाळी ९:२० वाजता लिहिलेल्या चिठ्ठीचे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *