कोल्हापुरात अल्पवयीन जोडप्याचा कारनामा अन् २ जिल्ह्यातील पोलीस दारात, आई-वडिलांना कळलचं नाही कि सुन…

सोशल मीडियावरील ओळखीचे आणि प्रेमाचे काही खरे नसते अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आलेली असून एका सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणाच्या भेटीसाठी एका अल्पवयीन मुलीने स्वतःचे राहते पनवेल येथील घर सोडून ती चक्क कोल्हापुरात करवीर येथे दाखल झालेली होती . अशिक्षित असलेल्या मुलाच्या आई-वडिलांच्या दारात चक्क पनवेल आणि करवीरचे पोलीस पाहिल्यानंतर चांगलीच भंबेरी उडाली होती.

पनवेल येथील अल्पवयीन मुलीची फेसबुकच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कोपर्डे येथील एका अल्पवयीन मुलासोबत ओळख झालेली होती. गेल्या एक वर्षांपासून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहत होते. शेकडो किलोमीटर दूर असताना देखील त्यांच्यात प्रेम फुलू लागले.

त्यानंतर त्याच्या भेटीच्या अशाने या तरुणीने या मुलीने पनवेल येथील राहते घर सोडले आणि ती त्याच्या घरी येऊन थांबली. गावात देखील या मुलीची जोरदार चर्चा सुरू झाली. आठ दिवस ती त्याच्या घरी होती मात्र अशिक्षित असलेल्या आई-वडिलांना देखील ती अल्पवयीन असल्याचा अंदाज आला नाही आणि त्यांनी देखील लग्नाची तयारी सुरू केली होती.

एकीकडे मुलीच्या घरचे तिचा शोध घेत होते तर दुसरीकडे मुलाच्या घरच्यांना या प्रकरणाची कल्पना नसल्याने त्यांनी लग्नाची तयारी सुरू केलेली होती. पनवेल पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे ही मुलगी कोल्हापुरातील करवीर परिसरात असल्याचे समोर आले.

दारात पनवेल पोलीस आणि करवीर पोलीस एकाच वेळी येऊन ठाकल्याने मुलाच्या घरच्यांची चांगलीच भंबेरी उडाली. दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर पोलिस मुलाच्या वडिलांना ताब्यात घेऊन करवीर पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आले आणि त्यानंतर मुलीला पनवेल पोलिसांच्या स्वाधीन केले. पनवेल पोलिसांसोबत मुलीची आई देखील कोल्हापूर येथे दाखल झालेली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *