कोल्हापुरात गावातल्या तरुणाचे २ मुलांच्या आईसोबत प्रेम जुळलं अन् ति शेतात गेल्यावर जिंदगीच संपली

शिरोली : मौजे वडगाव(ता. हातकणंगले) येथे अनैतिक संबंधातुन कविता चंद्रकांत कोरवी(वय.२६) हिचा पती चंद्रकांत किसन कोरवी(वय ३५) याने पत्नीचा धारधार विळ्याने गळ्यावर,पाठीवर आणि पोटावर वार करून खुन केला.हि घटना बुधवारी दुपारी २ च्या सुमारास सुतार पाणंद,बारबाहीच्या शेत परीसरात घडली असुन आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

घटनास्थळावरुन आणि शिरोली पोलीस ठाण्यातुन मिळालेली अधिक माहिती अशी कि,हातकणंगले तालूक्यातील मोजे वडगाव येथे शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील चंद्रकांत किसन कोरवी आणि त्याची पत्नी कविता हे कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी ४ वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

त्यांना एक १४ वर्षांचा आणि एक १२ वर्षांचा अशी २ मुले असून मोठा मुलगा हा निमशिरगाव येथे आजीकडे राहतो.तर लहान मुलगा हा आई-वडिलांच्याकडेचं राहतो.

पत्नी कविताचे गावातील एका युवकासोबत अनैतिक संबंध होते असा संशय पती चंद्रकांत आला होता.याबाबत २ वर्षांपूर्वी कविताला त्या व्यक्तीचे संबंध सोडुन दे असे चंद्रकांतने सांगितले होते.६ महिन्यांपूर्वी सुद्धा जवळच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते.चंद्रकांतने अनेकदा पत्नीकडे घटस्फोट मागितला होता.पण कविता घटस्फोट देत नव्हती.

कविताचे बाहेर तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते असा वारंवार संशय चंद्रकांतला येत होता.बुधवारी सकाळी ७ वाजता कविता शेतमजूरीसाठी अन्य महिलांच्या बरोबर बारबाही नावाच्या परिसरातील चौगुले यांच्या शेतात कामासाठी गेली होती.यावेळी संबंधित प्रियकर सुद्धा शेतात कामाला होता.

हे चंद्रकांतला समजल्यावर दुपारी २च्या दरम्यान चंद्रकांत हा चौगुलेच्या शेतात जाऊन पत्नीला घेऊन घरी येत होता.तु कामाला जायच नाही,असं सांगितलं असताना कामावर का गेलीस असे विचारले आणि दोघात भांडण झालं.

सुतार पाणंद येथे ते घरी येत असताना विहीरी शेजारी कविता बसली होती यावेळी चंद्रकांतने धारधार विळ्याने,कविताच्या गळ्यावर,पाठीवर आणि पोटावर सपासप वार केले.कविता रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावरच ठार झाली.चंद्रकांतने आपल्या हातातील सायकल तेथेच टाकुन थेट हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाला.यावेळी कविताच्या ओरडण्याचा आवाज गावकर्यांनी ऐकला.माहिती मिळताचं घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.यानंतर आरोपी चंद्रकांत कोरवीला शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *