कोल्हापुरात निर्दयी बाप गेला पण जातांना पत्नीसह लेकरांना भयंकर मृत्यू दिला

कोल्हापूर : पत्नीसह २ मुलांना पाण्यात ढकलुन पतीने गळफास घेत आत्महत्या केली.अंगाचा थरकाप उडवणारी हि घटना कोल्हापुरातील कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत घडली आहे.दरम्यान पाण्यात ढकललेल्या २ मुलांपैकी मुलीला वाचवण्यात यश आले आहे.हि घटना काल दुपारच्यावेळी डाव्या कालव्यात घडली.या प्रकरणी पती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पत्नी आणि लेकरांना ढकलले पाण्यात:
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील हसवडे ग्रामपंचायतच्या मागे राहणारे संदीप अण्णासो पाटील(वय ३६) हे पत्नी, मुलगी व मुलगा अशा परिवारासह राहत होते.संदीप यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय होता.

दरम्यान काल दुपारच्या सुमारास कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या डाव्या कालव्याच्या येथे संदीपने पत्नी राजश्री संदीप पाटील(वय ३२),मुलगा समित (वय ८) आणि मुलगी श्रेया पाटील (वय १४) यांना या कालव्याजवळ नेले.यावेळी त्याने दोन्ही मुलांना व पत्नीला पाण्यात ढकलुन दिले व संदीप पाटील तेथुन पसार झाला.

यावेळी मुलगी श्रेया ही कशीबशी पाण्यातुन बाहेर येत पाण्याच्या कडेला जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडताना गावकर्यांना दिसली.लोकांनी तिला बाहेर काढुन तत्काळ रुग्णालयात दाखल केले.यावेळी तिने आपले आई-वडील व भाऊ पाण्यात असल्याचं सांगितल.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताचं तात्काळ घटनास्थळी जात पाणबुडीच्या साह्याने माय-लेकाचा मृतदेह बाहेर काढला.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पतीची गळफास घेऊन आत्महत्या
दुसऱ्या बाजुला संशयित आरोपी संदीपचा पोलिसांनी शोध सुरू केला.संदीप पाटील याने कर्नाटकातील भोज येथील एका रस्त्यावर आपली दुचाकी लावुन शेतात जाऊन गळफास घेतला असल्याची माहिती मिळाली.या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी याचा मृतदेह ताब्यात घेतला.

संदीप पाटील यांच्या पँटच्या खिशात बायको व मुलाचे आधार कार्ड सापडले.त्यानुसार पोलिसांनी आधार कार्डवर असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता हा सर्व प्रकार उघड झाला.याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.मात्र संदीपने हे टोकाचे पाऊल का उचललं हे अजुन समोर आलेलं नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *