कोल्हापुरात पती-पत्नीचा पर्दाफाश, नवरा घरी दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना आणायचा अन् पत्नी त्यांच्यासोबत…

कोल्हापुर : बायकोच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्याअड्डा सुरू केला होता.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी बालिंगा(ता.करवीर) येथे छापा टाकुन वेश्या अड्ड्यावर कारवाई केली.पीडित पत्नीची सुटका करून पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलयं.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस निरिक्षक श्रद्धा आंबोले-बरगे यांनी सांगितल्यानुसार,बालिंगा परिसरात एका घरातच वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.मंगळवारी दुपारी अचानक छापा टाकला.तिथे पतीकडुनच बायकोच्या असहायतेचा गैरफायदा उठवत वेश्या अड्डा सुरु असल्याचे सुरु झाले.

पीडित महिला आणि तिचा पती दोघेही मुळचे कर्नाटकचे रहिवाशी आहेत.२ महिन्यांपुर्वीच त्यांनी ओएलएक्सवरून बालींगा परिसरात घर भाड्याने घेतले होते.अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील रवींद्र गायकवाड,मीनाक्षी पाटील,राजेंद्र घारगे,किशोर सूर्यवंशी,अश्विनी पाटील,अभिजीत पाटील,तृप्ती सोरटे, किरण पाटील आदींनी हि कारवाई केली आहे.

घर भाड्याने देताना घ्या काळजी
खोली भाड्याने घेऊन गुन्हे करण्याचे प्रकार वाढत असल्याने घर भाड्याने देताना घरमालकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी केले आहे.भाडेकरूचे ओळखपत्र,मोबाइल नंबर घ्यावेत,सोबतचं नातेवाइकांची माहिती घ्यावी,शेजाऱयांना भाडेकरूंची कल्पना द्यावी,भाडेकरार करावा तसेच स्थानिक पोलिसांनाही माहिती देणे देखील गरजेचे असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *