कोल्हापुरात महिलेसोबत धक्कादायक प्रकार, महिला एकटी दिसली, आजु-बाजुला पाहिलं अन् तिच्याजवळ जाताचं…

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये रस्त्याने एकटी जाणाऱ्या महिलेला धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. गणपती मंदिरात दर्शनासाठी निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहत परिसरात ही घटना घडली. याठिकाणी आज सकाळी एक महिला सोसायटीमधीलच गणपती मंदिरात दर्शना निघाली होती. मंदिर जवळच असल्याने ती एकटी निघाली. परंतु रस्त्यात तिला एकटी पाहून चोरट्यांनी डाव साधला.

ही महिला रस्त्यावरून जात असताना बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावली आणि तेथून लगेच पळ काढला. ही घटना घडली तेव्हा महिला एकटी असल्याने तिने आरडाओरड केली परंतु तिथे कोणीच आले नाही. या घटनेने महिला हादरून गेली आहे. ही संपूर्ण घटना तेथे परिसारत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Kolhapur Crime)

सीसीटीव्हीत दिसणाऱ्या फूटेजनुसार हे चोरटे ज्या दुचाकीवरून आले होते ती कर्नाटक पासिंगची असल्याचे दिसत आहे. तसेच दोन चोरट्यांनी महिलेची चेन हिसकावून दुचाकीवरून पलायन केल्याच दिसत आहे. दिवसाढवळ्या चोरट्यांनी महिलेच्या चेनवर डल्ला मारल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *