कोल्हापुरात माय-लेक घरी आले, आई किचनमध्ये असल्याचा फायदा घेत मोबाईल घेऊन खोलीत गेला अन् आईला धक्काचं दिला

Kolhapur Crime: वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक असलेल्या तरुणाने व्हाॅट्सअॅपला स्वत:चा फोटो ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील कळंब्यात घडली. अवधूत अजित डाकवे (वय 24, रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, सध्या कळंबा) असे त्याचे नाव आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर तो आणि आईसह राहत होता.

अवधूत आई सुरेखा हे दोघेच मंगळवार पेठेतील डाकवे गल्लीत राहत होते. त्याच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने त्याचा सांभाळ केला होता. दोघेही आई एका खासगी दवाखान्यात नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे दोघेही दवाखान्यात बाहेर पाडल्यानंतर आई जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. अवधूतने दुसऱ्या खोलीत मोबाईलवर स्वतःचा फोटो स्टेटसवर ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे हा स्टेटस मित्रांसह नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्याला तातडीने फोन केला, पण त्याचा फोन बंद होता.

स्टेटस अपडेट केल्यानंतर अवधूतने लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गळफास सोडवून अवधूतला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आईला धक्का बसला आहे. लग्नासाठी प्रयत्न सुरु असतानाच अवधूतने घर बांधून लग्न करु असे आईला सांगितले होते. त्यामुळे कळंब्यात भाड्याने होते. त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अवधूतने केलेल्या आत्महत्येमुळेआईला धक्का बसला आहे.

आणखी दोन आत्महत्येच्या घटना
दरम्यान, कोडोली येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. रामचंद्र शामराव बुधगावकर (वय 38) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून तुळीला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दुसरीकडे हणमंतवाडी (ता. करवीर) येथील एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली. रंगराव बाजीराव देशमुख (वय 50) असे त्यांचे नाव आहे. ते घरात कोणाला न सांगता घरातून बाहेर पडून कागल येथे आले होते. त्यांनी जयसिंगराव पार्क मध्ये आयसीआरई प्राइड या इमारतीच्या तळमजल्यात गळफास घेत आत्महत्या केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *