कोल्हापुरात सुनेने सासर्याला मटनातुन विष देऊन मारलं, पोलिसांकडुन भयंकर कारणाचा खुलासा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. जमीनीच्या वाटणीवरून सासऱ्याला मारण्यात आले आहे. मटणाच्या जेवणातून विषारी औषध घालून मारल्याचा प्राथमीक अंदाजानुसार माहिती समोर आली आहे. अत्यवस्थ झालेल्या आण्णाजी बापू जाधव (वय 72, रा. बाचणी, ता. कागल) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सून रूपाली दत्तात्रय जाधव हिच्यावर मटणाच्या जेवणात विषारी औषध घातल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
अण्णाजी जाधव यांची सून रुपाली ही सध्या फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. बाचणी येथील आण्णाजी जाधव यांना दत्तात्रय व नामदेव ही दोन मुले आहेत. अण्णाजी यांनी आपली मालमत्ता दोन्ही मुलांच्या नावे केली होती
दत्तात्रय याचा 12 वर्षापूर्वी कावणे येथील रुपाली हिच्याशी विवाह झाला. त्यांना ‘मुलगा व मुलगी अशी दोन अपत्य आहेत. एक वर्षापूर्वी दत्तात्रय याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर रुपाली सर्व मालमत्ता विकणार असल्याची कुणकुण आण्णाजी यांना लागली. त्यामुळे त्यांनी स्वतःच केलेला दस्त रद्द करून आपल्या संपत्तीत मुलींचीही नावे लावण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे रुपाली अस्वस्थ होती.
26 जुलै रोजी तिने सासरे आण्णाजी व दीर नामदेव यांना मटण बनवून दिले. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच आण्णाजी यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्रथम शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि. 10) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.कावणे (ता. करवीर) येथील माहेरी राहणाऱ्या सून रुपालीला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता घरातील आई, वडील, भावासह ती फरार झाल्याचे स्पष्ट झाले.