कोल्हापुरात ३० वर्षाची कामवाली बाई एकाचवेळी २ मालकांच्या प्रेमात झाली खुळी ; काय करावा कळांना अन् डोक लढवलं
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पहिल्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी महिलेसह तरुणास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह सात वर्ष कारावास आणि प्रत्येकी ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. संतोष पुंडलिक कापसे (वय २४, रा. वाठार तर्फ वडगांव, ता. हातकणंगले) व दमयंती राजू यादव (३०, रा. इंदिरानगर, इचलकरंजी) अशी या आरोपींची नावे आहेत.
दमयंती यादव हिने कापसे याच्या मदतीने पहिला प्रियकर सुशांत मोरे याचा डोक्यात बॅटचे घाव घालून २५ जून २०१४ रोजी खून केला होता.या प्रकरणाची माहिती अशी की, दमयंती यादव ही सुशांत मोरे यांचे वडील दत्ता मोरे यांच्याकडे कामास होती. तेव्हा तिचे आणि सुशांतमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर संतोष कापसे याने सातारा येथे हॉटेल चालवायला घेतले होते. तिथे दमयंती कामास जात होती. त्याचदरम्यान दमयंती यादव आणि संतोष कापसे यांच्यामध्ये ही प्रेमसंबंध निर्माण झाले.
ही बातमी सुशांत मोरे याला समजली. त्यामुळे सुशांत मोरे हा पूर्वी आरोपी राहात असलेल्या ठिकाणी वडगाव हद्दीत आला असता या दोघांनीही प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोरे याच्या डोक्यात लाकडी बॅटचे घाव घालून खून केला. त्याच्याच दुचाकीवरून मृतदेह निलेवाडी ते ऐतवडे मार्गावर उसाच्या शेतजमिनीकडेला झुडपात टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
वडगाव पोलिसांनी सखोल तपास करून या दोघांना अटक केली. जिल्हा न्यायालयात हा खटला चालला. याकामी एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामधील साक्षी, सरकारी वकीलांचा युक्तिवाद आणि तक्रारी ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेप, सात वर्षाच्या कारावासासह प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले.