कोल्हापुरात ४१ वर्षाच्या बायकोचे बाहेर तरुणांशी संबंध जुळले, प्रेमप्रकरण सुरु झालं पण पतीला कळताचं…

कोल्हापूर: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खून प्रकरणी पत्नीसह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १२ जानेवारी २०११ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील खटल्याचा आज, जिल्हा व सत्र न्यायालयात निकाल लागला. जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी या गुन्ह्यातील ११ आरोपींना दोषी ठरवत त्यातील आठ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपी रवी रमेश माने, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दत्ता माने, आकाश उर्फ अक्षय सिताराम वाघमारे, दिलीप वेंकटेश दुधाळे, अमित चंद्रसेन शिंदे (मयत), लीना नितीन पडवळे, गीतांजली विरुपाक्ष मेनशी, सतीश भिमसिंग वडर (फरारी), इंद्रजीत उर्फ चिल्या रमेश बनसोडे (फरारी) आणि मनेश साहेबांना कुचीकोरवी अशी आरोपींची नावे आहेत.

दीड लाख रुपयांची सुपारी
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खुनाची सुपारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिली होती. या प्रकरणात आरोपी लीना पडवळे ही गुन्ह्यातील मृत नितीन बाबासाहेब पडवळे (वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांची दुसरी पत्नी आहे. गीतांजली मेनसी ही लीनाची मैत्रीण आहे.

लीना नितीन पडवळे (वय ४१, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि रवी रमेश माने (३८, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका, कोल्हापूर) या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यावरून लीनाने रमेश यास अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याने नवरा मारहाण करतो, त्याला संपवून टाकूया, असे सांगितले. त्यावर अमित चंद्रसेन शिंदे याने खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी घेतली.

आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड
त्यावर सर्व संशयित आरोपींची कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये बैठक होऊन कट रचण्यात आला. त्यानुसार, नितीन पडवळे याला १२ जानेवारी २०११ रोजी आर के नगर येथील खडीचा गणपती येथे बोलावून घेतले. तेव्हा अमित शिंदे याने लाकडाने डोक्यात वार करून नितीन याला जखमी केले.

तसेच, सोन्याची चेन काढून घेतली. जखमी नितीन यास रात्री शाहूवाडी तालुक्यातील नागझरी या दुर्गम भागात नेले. तेथे शिंदे याने चॉपरने नितीनचे शीर धडा वेगळे केले. याची सर्व छायाचित्रे त्यांनी रवी व मीना यांना पाठवली. त्यानंतर खुनासाठी वापरलेले सर्व साहित्य वारणा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट केला होता.

या प्रकरणात सरकारी अभिवक्ता समीउल्ला महंमदइसक पाटील यांनी २१ साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात आठ आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात तपास अधिकारी डी एस घोगरे, पोलीस पैरवी अधिकारी फारूक पिरजादे यांची सुनावणी वेळी महत्त्वाची मदत झाली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *