क्रुरतेच्या मर्यादा पार! प्रेयसीच्या नवऱ्याने गोड बोलून प्रियकराला मुक्कामाला ठेवलं अन् त्याचं रात्री जेवणानंतर…
क्रूरतेच्या मर्यादा पार करणारी एक घटना नवी दिल्ली इथे समोर आलेले असून एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणे एका व्यक्तीला फार महागात पडलेले आहे. या घटनेत त्याचा बळी गेलेला असून महिलेचा पती वारंवार त्याला समजावत होता मात्र तरीदेखील त्याच्या वर्तनात बदल झाला नाही.
म्हणून महिलेच्या पतीने योग्य संधी मिळाल्यानंतर त्याला आपल्या घरी बोलावले जेऊ घातले रात्री झोपायला सांगितले आणि पहाटेच्या सुमारास त्याच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केलेला आहे.उपलब्ध माहितीनुसार, मुंडका येथील एका कॉलनीत राहणाऱ्या महिलेची प्रदीप नावाच्या एका तरुणासोबत मैत्री झालेली होती .
पूजा असे या महिलेचे नाव असून तो आणि प्रदीप एकाच कंपनीत काम करत होते. दोघेही सोबत काम करत असल्यामुळे त्यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले आणि याची कल्पना महिलेच्या पतीला आली त्यानंतर त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनीही हे संबंध तोडण्यास नकार दिलेला होता.
एकीकडे पत्नीचा प्रियकर आपले ऐकत नाही तर दुसरीकडे पत्नी देखील आपले ऐकत नाही त्यामुळे हतबल झालेल्या पतीने अखेर तिच्या प्रियकराचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी पती गावी जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला आणि घरी आला त्यावेळी प्रियकर असलेला प्रदीप हा त्याच्याच घरी असल्याचे त्याला लक्षात आले. त्याला पाहिल्यानंतर प्रदीपने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेच्या पतीने त्याला गोड बोलून तिथेच थांबून धरले.
पतीने पत्नीला स्वयंपाक करायला सांगितले आणि तिच्या प्रियकराला देखील जेवण करून आज इथेच थांब असा आग्रह केला. महिलेचा पती आपल्याशी इतके गोड बोलत आहे मात्र त्याच्या मनात काय चाललेले आहे याचा अंदाज प्रदीपला आला नाही आणि प्रदीप तिच्या घरी जेवण करून तिथेच झोपलेला असताना महिलेच्या पतीने त्याच्या पोटात चाकू भोसकला. चाकू हल्ला झाल्यानंतर पूजाही धावत आली त्यावेळी तिने तिच्या प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. महिलेचा पती असलेला आरोपी चरण सिंह याला अटक करण्यात आलेली आहे.