खोपोली येथील भीषण अपघातापुर्वीचा बसमधला अक्सक्ल्युझिव व्हिडीओ समोर, मुल अंताक्षरी आणि डफली वाजतांना…
पुण्यातील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांज पथकाच्या बसचा शनिवारी पहाटे (१५ एप्रिल) खोपोली येथील बोरघाटात भीषण अपघात झाला. ही बस ३०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, तर २३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अपघाताच्या किती मिनिटांपूर्वीचा आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये बसमधील मुलं अंताक्षरी खेळताना दिसून येत आहेत. तसेच काही मुलं डफली वाजवतानाही दिसत आहेत.
नेमकं कसा घडला अपघात?
मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्यात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात वादन करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या ३०० फूट खोल दरीत कोसळली.
राज्य सरकारकडून मदतीची घोषणा
दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच जखमीच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकराकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं.