गावातली पहिली डाॅक्टर होणार होती पण त्याआधीचं मृत्यूने गाठलं, MBBS विद्यार्थिनीचा अकाली मृ्त्यू

जोधपूर शहरात बीजेएस परिसरात राहणाऱ्या MBBS विद्यार्थिनी अनिताचा मिझोरमच्या जोरम मेडिकल कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. अनिता नागौर तालनपूरची रहिवासी होती परंतु तिचं कुटुंब सध्या जोधपूरमध्ये वास्तव्यास होते. विशेष म्हणजे गावातील पहिलीच मुलगी अनिताने डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही दिवसच शिल्लक होते..

१९ मार्चला MBBS च्या अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण होणार होती. परंतु त्याआधीच ८ मार्चला अनिताचा कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आल्याने दुर्देवी मृत्यू झाला. अनिता ही गावातील पहिली महिला डॉक्टर बनणार होती. २०१८ मध्ये NEET मध्ये अनिताचं सिलेक्शन झाले होते. कुटुंबाने सांगितले की, आमची मुलगी मिझारोममध्ये MBBS करण्यासाठी गेली होती. परंतु त्याठिकाणी स्थानिक भाषेसह शिक्षण घेणे तिच्यासाठी खूप कठीण होते. अनिता अंतिम वर्षापर्यंत पोहचली. पण परीक्षा पूर्ण होण्याआधीच ८ मार्चला तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

जोधपूरमध्ये इंटर्नशिप करणार होती
मागील काही दिवसांपूर्वी काका उम्मेदसिंहसोबत पुतणी अनिताचं बोलणे झाले होते. तेव्हा अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण झाल्यावर ती जोधपूरमध्ये येऊन इंटर्नशिप करणार होती. परंतु ८ मार्चला तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. सर्वात मोठं दुःख की अनिताच्या जागी तिचा मृतदेह १० मार्चला गावी पोहचला. ११ मार्चला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिताचे वडील सोजत इथं पोलीस खात्यात एएसआय पदावर कार्यरत होते. एक भाऊ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घ्यायचा. तर छोटा भाऊ
भारतीय वायू सेनेत Indian Air Force कार्यरत आहे. अनितानं तिच्या स्वभावानं कॉलेजमध्ये सर्वांची मने जिंकली होती. त्याच कारणाने ८ मार्चला तिचा मृत्यू झाल्यानंतर कॉलेजमध्ये होणारी ९ मार्चची परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *