गोंधळच गोंधळ…! पाकिस्तानी हसीना सीमा हैदरचे किती ‘प्रियकर’? आता समोर आला आणखी एक ‘lover’

PUBG खेळता पार्टनरच्या प्रेमात पडलेल्या आणि नंतर चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरसंदर्भात रोजच्या रोज नव-नवीन गोष्टी समोर येत आहेत. आपण सचिन मीनासोबत लग्न केले असून तो आपला पती असल्याचे सीमा हैदर सांगत आहे. मात्र असे असले तरी, तो तिचा एकटाच प्रियकर नाही. कारण, स्वतःला सीमा हैदरचा एक्स प्रियकर म्हणवणाऱ्या पाकिस्तानातील एका तरुणाने सीमा संदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.

या तरुणाने, सीमाचा भारतात येण्यामागील खरा उद्देश आणि पाकिस्तानला परतण्याची वेळही सांगितली आहे.पाकिस्तानी तरुणाचा दावा -पाकिस्तानी महिला सीमा हैदरसोबत PUBG खेळणारा आणखी एक तरुण समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणाने दावा केला आहे की, तो सीमाच्या दोन वर्षांपासून संपर्कात होता.

पाकिस्तानातील एका यूट्यूब चॅनलने या तरुणाची मुलाखत दाखविली आहे. यात त्याने, सीमासोबत आपली मैत्री होती, आपण सीमाला भेटलोही आहोत. तसेच, आम्ही लग्न करण्याचेही ठरवले होते, असे म्हटले आहे.या पाकिस्तानी तरुणाने दावा केला आहे की, सीमा क्रिकेटची चाहती आहे. तिचा भारतात पोहचण्याचा हेतू केवळ वर्ल्डकप 2023 पाहणे आहे. वर्ल्डकप पाहिल्यानंतर, सीमा पुन्हा तिचा पती गुलाम हैदर कडे जाईल.

व्हिसा न मिळाल्याने सीमा अशी आली भारतात -खरे तर, सीमा विवाहित आहे. तिचा नवरा दुबईत काम करतो. त्याच्यापासून तिला 4 मुले आहेत. पण, सचिनच्या संपर्कात आल्यानंतर तिने पाकिस्तानातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी व्हिसा न मिळाल्याने, ती नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली.

या अटीवर मिळाला जामीन – मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडू येथील मंदिरात सचिन आणि सीमा यांचा विवाह झाला आहे. न्यायालयाने पत्ता न बदलण्याच्या आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर या दोघांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सचिनच्या वडिलांनाही जामीन मिळाला आहे. जेवर दिवाणी न्यायालयाच्या ज्यूनिअर डिव्हिजनचे न्यायाधीश नाजीम अकबर यांनी वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, त्यांना जामीन मंजूर केला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *