घनदाट जंगलात महिला अडकली, ५ दिवस फक्त दारुवर जगली, VIDEO पाहून डोळे फिरतील

कॅनबेरा: एक महिला एका घनदाट जंगलात हरवली होती. त्यानंतर ती तब्बल पाच दिवस त्या जंगलात अडकून पडली होती. तिचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. या ४८ वर्षीय महिलेच्या बचावकार्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये ही महिला एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी दिसत आहे. तिच्या आजूबाजूला उंचच उंच झाडं दिसत आहेत. इतके दिवस जंगलात अन्न-पाण्याशिवाय ही महिला कसी जगली तेही तिने सांगितलं आहे, हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील असल्याची माहिती आहे.

लिलियन नावाची ४८ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिला व्हिक्टोरिया हाय कंट्रीच्या सहलीवर होती. ती तिच्या गाडीतून प्रवास करत होती. यादरम्यान ती रस्त चुकली आणि जंगलात हरवली. चिखलात रुतल्याने तिची गाडी तिथेच अडकली. यावेळी तिच्या मोबाईलमध्ये ना नेटवर्क होते ना गाडीचा जीपीएस काम करत होता. अशा स्थितीत लिलियन कोणाकडेही मदत मागू शकत नव्हती.

दुसरीकडे, लिलियनच्या कुटुंबीयांना तिची काळजी वाटू लागली. बराच वेळ झाला लिलियनशी संपर्क होत नसल्याने त्यांनी थेट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पण, लिलियनला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे लिलियनला शोधण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली, त्यानंतर शोध पथकाला जंगलात एक कार दिसली. त्यानंतर लिलियनपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आणि तिची सुटका करण्यात आली. मात्र, चिखल आणि दलदलीमुळे बचावकार्यात अडचण आली.

लिलियनने सांगितले की, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी विशेष काही नव्हते. तिच्याकडे फक्त लॉलीपॉप आणि स्नॅक्सची कीह पकिटं आणि वाईनची बाटली होती. याच्या भरवश्यावर तिने पाच दिवस काढले. जेव्हा बचाव पथकाने हे ऐकले की लिलियन इतके दिवस लॉलीपॉप खाऊन आणि दारू पिऊन जगली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ शेअर करताना रेस्क्यू टीमने लिहीले की, ‘तो क्षण पाहा जेव्हा एअर विंगने घनदाट जंगलात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेतला’.

या घटनेबाबत, स्थानिक पोलीस प्राधिकरणाचे सार्जंट मार्टिन टॉर्प म्हणाले – लिलियन दारू पीत नाही. ती वाईनची बाटली तिने भेट द्यायला घेतली होती. पण, परिस्थिती अशी बनली की तिला दारु पिऊन रहावे लागले. लिलियनने स्वत:साठी काही स्नॅक्स आणि लॉलीपॉप घेतले होते पण ती पाणी घ्यायला विसरली होती. पण, पाच दिवस फक्त दारुवर ती जगत होती त्यामुळे पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *