घऱची हालाखीची परिस्थिती, स्वत: कष्ट करुन जगणार्या तरुणीचा जळगावात दुर्दवी मृ्त्यू

जळगाव : कामानिमित्ताने महामार्गावरून जात असताना स्कुटी घसरल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात तब्बल ४ दिवस ति मृत्यूशी झुंज देत होती.मात्र हि झुंज अपयशी ठरली असुन उपचार सुरू असताना शनिवारी रात्री या मुलीचा मृत्यू झाला.पूनम सुनील विसपुते(वय. २७) असं मयत तरुणीचं नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे पूनम विसपूते हि तरूणी आपल्या कुंटुबासह वास्तव्याला होती.पुनम हि शहरातील एका खासगी जीममध्ये सेल्स मॅनेजर म्हणुन काम करायची.

शहरातील महामार्गालगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन गेल्या काही दिवसांपासुन दुरुस्तीचे काम सुरू आहे.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर खोदकाम करण्यात आलं असुन,याच खोदकामाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुनम दुचाकीने जात असताना तिची दुचाकी घसरुन हा अपघात झाला होता.

या अपघातात पूनमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.याचदरम्यान पूनम हिचा जीममधील सहकारी लोकेश बारसे या ठिकाणाहुन जात होता.त्यानंतर लोकेशने चौकशी केल्यावर जखमी तरुणी हि तो काम करत असलेल्या जीममधील सेल्स मॅनेजर असल्याने त्याने पूनमला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

उपचाराच्या आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन
पूनम हिची घरची परिस्थिती हालाखीची आहे.तिचे वडील सुनील विसपुते हे सुरक्षारक्षक म्हणुन काम करतात,तर भाऊ हितेश हा एका कुरिअर कंपनीत जाॅबला आहे.डोक्याला दुखापत असल्याने तिच्या उपचारासाठी खुप पैशांची आवश्यकता होती.यासाठी पूनमच्या मित्र-परिवारासह इतरांकडुन सोशल मीडियावर पूनमच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन देखील करण्यात आले होते.

एकीकडे पैसा गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना,दुसरीकडे पूनमची प्राणज्योत मालवली.शनिवारी रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.पूनम अचानक गेल्याने कुटुंबासह तिच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे.पूनमच्या घरच्यांचा रुग्णालयातील आक्रोश मन हेलावुन टाकणारा होता.पूनमच्या पश्चात वडील,मोठी बहिण आणि भाऊ असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *