चंद्रपुरात ओझं उचलतांना सुनेवर अतिप्रसंग करण्याचा पुतण्याचा प्रयत्न, सासु भडकली पण पुतण्या काय…

चंद्रपूर : चुलत पुतण्याने आपल्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सासूला मिळाली. ती याचा जाब विचारायला पुतण्याकडे गेली. त्यामुळे राग अनावर झालेल्या पुतण्याने दगडाने ठेचून काकूची हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्हात उघडकीस आली आहे. ही घटना आज तीन वाजताचा सुमारास पोंभूर्णा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोनापूर येथे घडली.

मोठ्या आईला (काकूला) शेणाच्या खड्ड्यात टाकून आरोपी फरार झाला. पुष्पा मधुकर ठेंगणे (६२) असे मृतक महिलेचे नाव आहे. आरोपी धीरज रविंद्र ठेंगणे (२०) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर येथील मृत पुष्पा ठेंगणे यांची पीडित सून ही शेतातून दुपारी घरी परत येत होती. धीरज ठेंगणे हा आपल्या गुराच्या गोठ्याजवळ काम करीत होता. डोक्यावरील ओझं उचण्याच्या बहाण्याने तिला बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार सासू पुष्पा यांना सांगितला. सूनेने घडलेला प्रकार सांगताच संतापलेल्या सासूने जाब विचारण्यासाठी पुतण्याकडे गेली.

आरोपी धीरज याने जवळ असलेल्या दगडाने ठेचून आपल्याच काकूची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला ओढत बाजूला असलेल्या शेणखताच्या खड्ड्यात फेकून दिले आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. घटनास्थळावर मृत पुष्पा यांचा मुलगा गेला असता तिथे आई मृतावस्थेत त्याला दिसली. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. फरार आरोपींवर पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मनोज गदादे करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *