चंद्रपुरात ३ महिन्यांच्या गर्भवती शिक्षीकेची एक चूक अन् सुखी भविष्याची सारी स्वप्नं धुळीस मिळाली; मृत्यूने शहरात पसरली शोकांतिका

चंद्रपूर: हिटरवर पाणी गरम करण्याकरिता गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली. सोनू बाग (वय २८) असं मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हळहळला आहे.

पाणी तापवायला गेली अन् घात झाला
जिल्ह्यातील विरुर रेल्वे वसाहतीत सोनू बाग राहत होती. काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. पाणी तापाविण्यासाठी तिने हिटर सुरु केला. त्याचवेळी तिला विजेचा जोराचा धक्का बसला. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. तेव्हा कुटुंबियांनी तिला तात्काळ उपाचारासाठी विरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती होताच विरुरवासी हळहळले.

आठ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
मृतक महिलेचा पती गोपाल महानंद रेल्वे विभागात कार्यरत आहेत. आठ महिन्यापूर्वी त्यांचा आणि सोनी बाग हिचा विवाह पार पडला होता. मृतक सोनी कॉनव्हेन्टमध्ये शिक्षिका होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाच वर्षांची चिमुरडी आईचा प्रेमाला मुकली
मृतक सोनी हिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. तिला पाच वर्षांची मुलगी आहे. घटस्फोटानंतर तिने आठ महिन्यांपूर्वी गोपाल महानंद याच्याशी विवाह केला. ती तीन महिन्याची गर्भवती होती. आज घडलेल्या घटनेत तिच्या दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पाच वर्षाची मुलगी आईचा प्रेमाला मुकली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *