चक्क मुलीच्या डोक्यात गर्भधारणा, विज्ञानालाही आव्हान; जगाला कोड्यात टाकणारी घटना उघडं

बीजिंग : एका जगावेगळ्या घटनेमुळे संपूर्ण जग हादरून गेलं आहे. या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे विज्ञानासमोर आव्हान निर्माण झालं आहे. घटनाच तशी आहे. चक्क एका मुलीच्या डोक्यात गर्भधारणा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी अवघ्या एक वर्षाची असून तिच्या डोक्यात मुल वाढताना दिसत आहे. या घटनेची अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीनेही दखल घेतली आहे.

अकादमीच्या न्यूरोलॉजी या जर्नलमध्ये त्यावर लेख छापून आला आहे. त्यामुळे सर्वांनाच या चमत्काराचं आश्चर्य वाटत आहे. हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.मीडिया रिपोर्टनुसार ही घटना चीनमध्ये घडली आहे. एका एक वर्षाच्या मुलीचं डोकं अचानक वाढू लागलं. तिच्या डोक्याचा आकार फुग्यासारखा वाढत जात होता. त्यामुळे तिच्या डोक्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्या डोक्यात एक गर्भ विकसित होत असल्याचं दिसून आलं.

डॉक्टरांनी सर्जरी करून हा गर्भ काढून टाकला. त्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. जेव्हा ही मुलगी आईच्या गर्भात होती. तेव्हाच या फीटस (fetus)ची वाढ या मुलीच्या डोक्यात होण्यास सुरुवात झाली होती, असं सांगितलं जातंय.

डोक्यात होत होता गर्भाचा विकास
डॉक्टरांच्या मते या जन्माला न आलेल्या मुलाची लांबी चार इंच होती. त्याचे कंबर आणि हाडे विकसित होत होती. तसेच त्याच्या बोटाला नखेही आले होते. ही मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या डोक्यात नवा गर्भ वाढतोय हे समजलं नाही. जेव्हा या मुलीच्या डोक्याची साईज अचानक दिवसे न् दिवस वाढू लागली तेव्हा तिच्या डोक्यात गर्भ वाढत असल्याचं आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या डोक्यात गर्भ वाढत असल्यामुळेच या मुलीची वाढही खुंटली होती. या मुलीच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरला दाखवले. तिच्यावर उपचार केले. आणि सर्जरीद्वारे तिच्या डोक्यातील फीटस (fetus) काढून टाकण्यात आले.

200 घटना घडल्या
या टर्मला मेडिकलच्या भाषेत फीटस (fetus) इन फिटू असं म्हटलं जातं. यात गर्भात जुळी मुलं एकमेकांना जोडलेले असतात. ट्विन्स गर्भात एकमेकांना वेगळं केलं जात नाही. ते आपल्या जुळ्यांमध्येच समाविष्ट होतात. त्यातच त्यांची वाढ होऊ लागते. त्यामुळे असं घडतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. जगभरात अशा प्रकारच्या 200 हून अधिक केसेस घडल्या आहेत. यातील बहुतेक केसेसमध्ये डोक्यातून गर्भ काढण्यात आला आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *