चिमुरडा चाॅकलेट आणायला गेला, त्याची बाॅडी थेट तलावात सापडली; घटना वाचुन तुमचा थरकाप उडेल

रांची: खंडणीच्या उद्देशाने एका ९ वर्षीय चिमुरड्याचे अपहरण करुन त्याचा खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना रांची शहरात घडली.रांची शहरातील बरीयातु येथील एदलहाटु परिसरात हि घटना घडली आहे.याप्रकरणातील आरोपी संजु पांडा याला रांची पोलिसांनी अटक केली आहे.

संजु पांडा हा पुर्वी त्याच्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहत होता,जे शौर्य यांच्या घरात भाडेकरू होते.खंडणीच्या उद्देशाने संजुने शौर्यचे अपहरण केले.मात्र,यामध्ये त्याला यश आले नाही.त्यामुळे त्याने नंतर शौर्यची हत्या करून त्याचा बाॅडी गोणीत भरुन तलावात फेकुन दिली.

एदलहाटु येथील रहिवासी राजु यादव यांचा मुलगा शौर्यचे गेल्या शुक्रवारी सायकांळी अपहरण करण्यात आले होते.त्यानंतर मंगळवारी नागडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सपारिम गावाजवळील तलावात त्याची बाॅडी सापडल्याने खळबळ माजली.शौर्यच्या खुनाची बातमी पसरताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.मंगळवारी संध्याकाळी हजारों लोकांनी रांचीमधील राजभवन-बुटी रस्ता बराचं वेळ रोखुन धरला.संतप्त लोकांनी बरियातु पोलीस ठाण्याला घेरावही घातला होता.

पोलिसांनी सांगितल्यानुसार,संजु पांडाची बहीण हि राजू यादव यांच्या घरी भाडेकरू म्हणुन राहते.संजुही त्याच्यासोबत राहत होता.यामुळे शौर्य त्यांच्यात मिसळला.नंतर संजु गेल्या काही आठवड्यापासुन रांचीच्या पुंडग भागात रुम घेऊन वेगळा राहत होता.चुकीच्या संगतीत पडल्यामुळे तो प्रचंड कर्जबाजारी झालेला होता.त्यामुळे शौर्यचे अपहरण करुन त्याच्या घरच्यांतडुन ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव त्यांनी आखला.

शुक्रवारी सायंकाळी शौर्य घराजवळील दुकानातुन चाॅकलेट घेण्यासाठी गेला असता असता संजू गाडी घेऊन तेथे उभा होता.त्याने शौर्यला बोलण्याच्या बहाण्याने बोलावुन त्याला दमदाटी करून गाडीत टाकलं.शौर्य कारमध्ये आरडाओरड करत होता.तेव्हा संजु हा घाबरला आणि त्याने त्याच्या डोक्यावर शस्त्राने ३-४ वेळा वार केले.यामुळे शौर्य रक्त बंबाळ झाला आणि तिथेच बेशुध्द झाला.यानंतर संजुने गाडी नगडीकडे नेली.

तिथे त्याने शौर्यच्या डोक्यात सतत वार करून त्याचा खुन केला आणि बाॅडी गोणीत टाकुन तलावात फेकून दिली.त्यानंतर संजु त्याच दिवशी कोडरिमा येथील त्याच्या घरी पळुन गेला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खंडणी आणि अपहरण प्लॅन करण्यासाठी संजुने हि कार भाड्याने घेतली होती.या खुनात संजुसोबत अजुन कोणाचा समावेळ आहे हे अद्याप माहिती नसुन पोलीस तपास करत आहेत.मात्र,एका व्यक्तीच्या लालसेपोटी एका मुलाचा नाहक बळी गेल्याने लोकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *