चेहऱ्याचा चेंदामेंदा, कपडे व्यवस्थित; बुलढाण्यात ६ वर्षाच्या राधिकासोबत जे घडलं, तुम्ही कधीचं ऐकलं नसलं असं…

बुलढाणा : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील तपोवन देवी मंदिर परिसरातून हरवलेल्या एका ६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राधिका विलास इंगळे असं या मुलीचं नाव असून तिचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील भागात आढळून आला आहे. बाळापूर येथील मूळ निवासी असलेले विलास इंगळे आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. दरम्यान, काल सकाळी ११ वाजेपासून राधिका बेपत्ता होती.

राधिका बेपत्ता झाल्यापासून तिचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राधिकाचा शोध घेणे सुरू केले होते. काल दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तपोवन देवीच्या मंदिर परिसरातील मागील भागात राधिकाचा मृतदेह आढळून आला.

राधिकाचा मृतदेह आढळला तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आलेला होता. अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून ५०० मीटर अंतरावर राधिकाचा मृतदेह सापडला. काल दुपारी जवळपास २०० ते २५० लोकांनी संपूर्ण मंदिर परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा राधिका आढळून आली. राधिका या अवघ्या ६ वर्षीय चिमुरडीची हत्या कोणी आणि का केली? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *