चोरीच्या आरोपात पतीला तुरुंगात पाठवलं अन् सुटका होऊन घरी येताचं पतीला अजुन मोठा धक्का बसला

लखनऊ 11 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एक महिला पती आणि 5 मुलांना सोडून प्रियकरसोबत फरार झाली. महिलेचा पती आता पत्नीच्या शोधात पोलीस ठाण्यात फेऱ्या मारत आहे. पत्नीने सर्व दागिने आणि जमा केलेलं भांडवलही आपल्यासोबत नेलं असल्याचं पतीचं म्हणणं आहे. पतीने या प्रकरणी तक्रार केली, मात्र सुनावणी अद्यापही झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरेलीच्या सीबीगंज भागातील आहे. इथे राहणार्‍या पीडित व्यक्तीने सांगितलं की, टेम्पो विकल्यानंतर त्याने सुमारे 27 हजार रुपये घरात ठेवले होते. तो कामावरून घरी परतला तेव्हा घरी पत्नी नव्हती. त्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. सर्व मुले घरी होती, पण पत्नी बेपत्ता होती. पतीनं सांगितलं, की ‘मी घरात पाहिलं असता दागिनं गायब होते आणि रोख रक्कमही त्याठिकाणी नव्हती. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली.’

पत्नीचे जावेद नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं पतीनं सांगितलं. जावेद श्यामगंजमध्ये फळांचा स्टॉल लावून फळविक्री करतो. महिलेच्या पतीने सांगितलं की, जावेदसोबत पत्नीचं अफेअर कधीपासून सुरू होतं याबाबत त्याला काहीच माहिती नाही. त्याची पत्नी सुमारे 25 दिवसांपूर्वी जावेदसोबत पळून गेली.

पीडित पतीने सांगितलंस की पत्नीनेच त्याच्यावर चोरीचा आरोप केल्याचे केला होता. याबाबत तिने पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात पाठवलं. या प्रकरणी 14 महिने तुरुंगात राहिल्याचं त्याने सांगितलं. यानंतर तो घरी परतला तेव्हा पत्नी घरीच होती, मात्र काही दिवसांनी ती फरार झाली. याशिवाय तिने फसवणूक करून घरही स्वतःच्या नावी करून घेतलं होतं.

पतीने या प्रकरणी पोलिसांकडे अनेकदा तक्रार केली आहे, मात्र कोणतीही सुनावणी होत नसल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. अजून काही सुगावा लागलेला नाही. पत्नीने 27 हजार रुपये आणि सोनं सोबत नेलं आहे. पतीने सांगितलं की, त्याला 5 मुलं असून त्यांना सोडून पत्नी जावेदसोबत गेली आहे. तो जावेदला कधीच भेटला नाही. फक्त तो फळं विकतो हे त्याला माहिती आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *