जळगावात आईला नग्न अवस्थेत आतेभावासोबत मुलानं पाहिलं अन् पुढं आईनी भलतचं केलं

जळगाव- महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण जळगाव जिल्ह्यातुन समोर आलेले होते.एका महिलेचे तिच्या आतेभावासोबत अनैतिक संबंध सुरू असल्याचे तिच्या मुलाने पाहिले.म्हणून रागावलेल्या या आईने अक्षरशः स्वतःच्या मुलाचे तुकडे करून त्याचा खुन केलेला होता.सदर आरोपी महिलेला आणि तिच्या आतेभावाला जिल्हा सत्र न्यायाधीश पी आर चौधरी यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,गिताबाई दगडु पाटील(वय 35) आणि तिचा आतेभाऊ समाधान विलास पाटील(वय 25 दोघेही राहणार चऱ्हाडी, ता.चोपडा) अशी आरोपींची नावे आहे.मंगेश दगडु पाटील(वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव होते.हि घटना 2 फेब्रुवारी 2019 रोजी घडली ज्यामुळं परिसरात एकट गोंधळ उडाला होता.

आरोपी आई गिताबाई हिचे तिचा आतेभाऊ असलेला समाधान याच्यासोबत अनैतिक संबंध सुरु होते.एके दिवशी ते शारिरीक संबंध ठेवतांना गीताबाई हिचा मुलगा मंगेश याने हे सगळे पाहिले आणि त्यानंतर हि गोष्ट वडिलांना सांगणार असल्याचं त्यानी सांगितल.त्यामुळं संतापलेल्या आईने त्याच्या डोक्यात काठीने वार केले.

त्यात तो बेशुद्ध झाला.त्यानंतर समाधान याने त्याच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यात त्याने प्राण सोडले.आरोपी आईने समाधानसोबत मिळुन अक्षरशः मुलाचे विळ्याने अनेक तुकडे करून विल्हेवाट लावली होती.मात्र अखेर प्रकरणाला वाचा फुटली आणि दोघांनाही अटक करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *