उलटी आल्यावर ‘ति’ एक चुक जीवावर बेतली, जळगावात अनुष्कानी सोडला जीव; तुम्ही ‘हि’ चुक करु नका अन्यथा…

जळगाव: शहरातील रामपेठ भागात झोपेत उलटी झाली व उलटी घशात अडकल्याने ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.अनुष्का मुकेश भोई(जावरे) असे मयत मुलीचे नाव आहे.अनुष्का हि जावरे दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी होती.

जळगाव शहरातील जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे हे आपल्या ८ वर्षांची मुलगी अनुष्कासोबत वास्तव्यास आहेत.अनुष्का हि जळगाव शहरात सिनियर केजी या वर्गात शिक्षण घेत होती.

शुक्रवारी अनुष्का हि सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती.दुपारी शाळेवरुन ति घरी आली.शाळेतुन घरी आल्यानंतर तिने आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगितले.तिचं शरीर गरम असल्याने ताप आला असावा म्हणुन आईने अनुष्काला झोपविण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान अनुष्काला अचानक २ वेळा उलटी झाली.गुळण्या करुन पाणी पाजुन आईने अनुष्काला पुन्हा झोपवलं.मात्र,तिला पु्न्हा उलटी झाली.पण यावेळी अनुष्का झोपेत असल्याने उलटी तोंडाबाहेर न येता तिच्या घशातच अडकली.त्यामुळे अनुष्काचा श्वास गुदमरला आणि ती बेशुद्ध झाली.अलका यांनी घाबरुन अनुष्काला तातडीने हाॅस्पिटलमध्ये नेले.मात्र,रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच अनुष्काने जगाचा निरोप घेतला होता.रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासुन मृत घोषित केले.

एकुलत्या मुलीच्या मुत्यूने कुटुंबीयांना बसला धक्का
अनुष्का शाळेत गेली आणि परतली तेव्हा असं काही भयंकर घडेल,याची कल्पना नव्हती.मात्र,काही वेळात उटली झाली आणि अनुष्काची प्रकृती जास्त खालावली.उपचार करण्यापुर्वीच तिने प्राण सोडले.अनुष्का हि एकुलती एक मुलगी होती.अनुष्काचे वडील जळगावातील MIDC तील एका कंपनीत नोकरीला आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *