जळगावात देवीच्या स्थापनेआधीचं संजय गेला, 😥आनंदाच्या उत्सवावर पसरली शोककळा

जळगाव: बऱ्हाणपूर येथून देवीची मूर्ती घेऊन येत असताना वाहनाचा अपघात झाला. अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडल्याने जळगाव शहरातील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरजवळील पूरणाड फाट्यानजीक घडली. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (३५, रा. जोशी वाडा, मेहरुण) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाड्यात सालाबादाप्रमाणे यावर्षीही नवरात्रीची तयारी सुरु होती. देवीची स्थापना करण्यासाठी मोठी तयारी या परिसरातील तरुणांकडून करण्यात आली होती.

स्थापनेसाठी मूर्ती ही बऱ्हाणपूर येथून आणण्याचे ठरले होते, त्यानुसार त्याठिकाणच्या कारागिराला पाहिजे तशी मूर्तीची ऑर्डर सुध्दा देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी शनिवारी काही तरुण मूर्ती घेण्यासाठी बऱ्हाणपूर येथे गेले होते.देवीची मूर्ती घेऊन परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्यावर मूर्ती घेवून येत असलेल्या वाहनाचा अपघात झाला.

या घटनेत देवीची मूर्ती नेमकी वाहनात उभ्या असलेल्या संजय कोळी या तरुणाच्या अंगावर पडली. मूर्ती मोठी असल्याने मूर्ती खाली दाबला जावून संजय गंभीर जखमी झाला. त्याला वाहनातील इतर तरुणांनी तातडीने मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, याठिकाणी उपचार सुरु होण्यापूर्वीच तरुणाची प्राणज्योत मालवली. या अपघातात संजय सोबत असलेले इतर तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आनंदाच्या उत्सवावर पसरली शोककळा:
मूर्ती स्थापनेसह वेगवेगळी तयार केली जात होती, काही तासांनी मूर्ती जळगावात पोहचले व स्थापना होईल, म्हणून तरुण आनंदात होते, मात्र याचदरम्यान रस्त्यात अघडीत घटना घडली व मूर्ती अंगावर पडल्याने संजय कोळी या तरुणाचा मृत्यू झाल्याने इतर मंडळांचे कार्यकर्ते देखील सुन्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने मुक्ताईनगर येथील रुग्णालय गाठले व याठिकाणी प्रचंड आक्रोश केला.

जळगावात मूर्ती स्थापनेची तयारी सुरु होत. सर्वजण मूर्तीची वाट पाहत असतांनाच ही दुर्देवी घटना घडल्याने ज्याठिकाणी नवरात्रीचा जल्लोष अन् आनंद होता, त्याठिकाणी आता शोककळा पसरली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत संजय याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *