जळगावात निवृत्त पोलिसाच्या आई-वडिलांनी गुपचुप औषध घेऊन झोपी गेले, कारण तुम्ही एकदा वाचाचं
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे वृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रामगीर ओंकार गोसावी (९०) आणि मंडाबाई रामगीर गोसावी (८०, रा. खेडगाव ता. भडगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध दाम्प्त्याचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून वृध्द दाम्पत्याने मृत्यूला कवटाळल्याची माहिती समोर आली आहे.
भडगाव तालुक्यातील खेडगांव येथील रहिवाशी मोतीगीर रामगीर गोसावी यांची आई मंडाबाई गोसावी व वडील रामगीर गोसावी यांनी दि. ७ रोजीच्या रात्रीच्या दरम्यान दम्याच्या आजाराला कंटाळून काही तरी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दि.८ रोजी सकाळी ७ .३० वाजेच्या सुमारास ही घटना उद्यडकीस आली आहे. गोसावी दाम्पत्य रात्री झोपी गेल्यानंतर सकाळी उशिरापर्यंत झोपेतून न उठल्याने त्याचा मुलगा त्यांना उठवायला गेला. त्यावेळी त्याला घरात आई-वडिलांचा मृतदेह आढळून आला.
रामगीर गोसावी यांना दम्याचा त्रास होता. गेल्या अनेक वर्षापासून ते खेडगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीत संचालक म्हणून बिनविरोध निवडून येत होते. त्यांच्या पश्चात निवृत्त पोलीस असलेला मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रामगीर गोसावी यांची दोन एकर शेती आहे. मुलगा मोतीगीर गोसावी हे सेवानिवृत्तीनंतर वडिलांसोबत होते.
सर्व काही सुरळीत असताना घटना घडल्याने कुटुंबासह शेजाऱ्यांना धक्का बसला आहे, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत मोतीगीर रामगीर गोसावी यांच्या खबरी वरून भडगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार पाडुरंग सोनवणे हे करीत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे एकाचवेळी पती पत्नी दोघांच्या आत्महत्येच्या घटनेने कुटुंबियांसह सर्व गाव सुन्न झाले आहे.