जळगावात पत्नी रुपालीच्या पोटातील बाळ देखील दगावले, क्षणात दोघांनाही आल मरण

जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२ रा मनवेल, ता यावल) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत विवाहिता आणि तिच्या पोटातील बाळ देखील दगावले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनवेल येथील रहिवाशी शितल उर्फ रूपाली विजय कोळी ही गरोदर महिला आपल्या घरी होती. दरम्यान, घरात तिने छताच्या आडव्या लोखंडी एँगलला साडीच्या साह्याने गळफास घेतला. कुटुंबिय घरी परतल्यावर त्यांना घरात प्रवेश करताच शितल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.

तिला कुटुंबियांनी तातडीने खाली उतरवून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते ते देखील दगावले आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे. दरम्यान आईच्या पाठोपाठ हे जग पाहण्याआधीच बाळाचेही प्राण गेले, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान शितल हिने एवढ्या टोकाचं पाऊल का उचलले याचाही उलगडा होवू शकलेला नाही. शितलच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *