जळगावात १९ वर्षाच्या जितेंद्रचं साक्षीसोबत प्रेमप्रकरण जुळलं, साक्षीसुध्दा प्रेमात बुडाली अन् रात्री शाळेमध्ये जे दिसलं…

जळगाव : प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याचे आपण अनेक वेळा वाचले असेल. अशीच एक घटना पाचोरा शहारत आज सकाळी उघडकीस आली. जितेंद्र राजू राठोड (19) व साक्षी सोमनाथ भोई (18) या प्रेमीयुगूलाने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेतील आत्महत्या केललेया साक्षीचे 23 जून रोजीच लग्न झाले असून ती रविवारी माहेरी आल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान, दोघांच्या आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसल्याने पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

जितेंद्र आणि साक्षी या दोघांनी मोंढाळे रस्त्यावरील एका पडक्या शाळेच्या खोलीत एकाच दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळताच पाचोरा शहरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक वसावे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले.

साक्षीचे 23 जून रोजी लग्न झाल्याने ती सासरी गेल्यानंतर पुन्हा रविवारी माहेरी पाचोरा येथे आली होती. मध्यरात्री तरुण विवाहिता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू असतानाच घराच्या मागील बाजूस अंगणवाडीत दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर कुटूंबियांना मोठा धक्काच बसला.

मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परीवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परीवार आहे. जितेंद्र राठोड याचा परीवार मोलमजुरी करतो तर साक्षी भोईचा परीवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो. दोघेही परीवार शहरातील एकाच भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, जितेंद्रने बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे पाचोरा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *