जळगावाात गाढ झोपेमुळं झाला तरुण शेतकर्याचा मृत्यू, रक्तबंबाळ अवस्थेत दिसला आजीला नातु

जळगाव : जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथील युवकाचा छतावरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली.अंकुश ज्ञानेश्वर चौधरी(वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.

अंकुश याला सकाळी आजी उठवण्यासाठी गेली असता,हि घटना उघडकीस आली आहे.गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश छतावरुन खाली पडल्याचे सांगितले जात आहे.या घटनेत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावात अंकुश चौधरी हा तरुण आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता.

अंकुशचे वडील कायम आजारी असतात.त्यामुळे अंकुशचं शेतीचे कामे संभाळतो.नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेतीची कामे आटोपुन अंकुश परतला.त्यानंतर जेवण करून घराच्या गच्चीवर झोपायला गेला.शेतात सध्या गहु,हरभरा काढण्याची लगबग सुरु आहे,त्यामुळे शेतीची अनेक कामे होती.त्यासाठी लवकर लवकरात कामे उरकावी,यासाठी अंकुशची आजी गोपाबाई विठ्ठल चौधरी ह्या बुधवारी सकाळी ६.१५ वाजता गच्चीवर झोपलेल्या नातवाला उठवायला गेल्य़ा होत्या.

यादरम्यान गच्चीच्या खाली रक्ताबंबाळ अवस्थेत अंकुश अज्जीला पडलेला दिसला.नातवाचा मृतदेह पाहुन आजीने मोठ्यानी ओरडत हंबरडा फोडला.ते ऐकुन घरच्यांनीही गच्चीकडे धाव घेतली,अंकुशला बाॅडी त्यांना दिसली.ते दृश्य पाहुन त्यांचा पायाखालीची जमीनचं जणु सरकली.अंकुश हा गच्चीवर झोपला होता.रात्री शौचालयास जाण्यासाठी उठला असता,झोपेच्या धुंदीत कठडे नसल्याने तो गच्चीवरुन खाली पडला व त्यातचं त्यानी जीव गेला.

बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी या घटनेची माहिती तालुका पोलीसांना कळवली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करुन बाॅडी जिल्हा रुग्णालयात हलविला.या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टन करून मृतदेह कुंटुबियांच्या ताब्यात देण्यात आला.

मयत अंकुशच्या पश्चात आई सुनिता,वडिल ज्ञानेश्वर,भाऊ भावेश आणि आजी गोपाबाई असा परिवार आहे.वडील आजारी सोबतचं कुटुंबांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्त्या मुलाचा अचानक मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *