जवानाच्या जिद्दीला सलामच! नाशिकमध्ये बायकोसह लेकरांना वाचवलं पण स्वत:ला नाही वाचु शकला

उमेश पारिक, टीव्ही 9 मराठी, सिन्नर ( नाशिक ) : नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेले सिन्नर येथील जवान गोदावरी नदीच्या ( Godavari River ) उजव्या कालव्यात वाहून गेले आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील चोंडी येथील ही घटना आहे. गणेश सुखदेव गीते ( army man Ganesh Gite ) असे त्यांचे नाव आहे.

शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सहा वर्षाच्या मुलीचा मोटरसायकलच्या हँडल मध्ये पाय अडकल्याने गाडीचा तोल गेला होता. तोल गेल्याने गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले होते. पत्नी रूपाली सह सहा वर्षाची मुलगी दीड वर्षाच्या मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले, मात्र दम लागल्याने स्वतःला ते वाचू न शकल्याने पाण्यात वाहून गेले आहेत.

गोदावरीच्या उजव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास पंधरा तासानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.गणेश सुखदेव गीते हे सुट्टीवर आलेले होते. आपल्या कुटुंबाला घेऊन ते शिर्डीला गेले होते. देवदर्शन झाल्यावर त्यांनी घराची वाट धरली होती. दुचाकीवरून येत असतांना गोदावारीचा उजवा कालवा लागतो. त्याच वेळी दुचाकी वर पढे बसलेल्या मुलीचा पाय हँडलमध्ये अडकला.

दुचाकीसह सर्वांचाच तोल गेला. आणि थेट कालव्यातच पडले. जवान गणेश गीते यांनी लागलीच आपल्या दोन्ही मुलांना पकडलं. आणि कालव्याच्या बाहेर काढलं. सोबत पत्नीही कालव्यात पडली होती त्यांना बाहेर काढलं पण त्याचवेळी त्यांचा श्वास कोंडला आणि ते वाहून गेले.

पत्नीसह मुलांच्या डोळ्यासमोर जवान गणेश गीते हे वाहून गेले. त्यांनी आरडा ओरड केला पण मदत झाली नाही. काही क्षणात जवान गणेश गीते नाहीसे झाले. रात्रीपासून शोधकार्य सुरू होते.तब्बल १५ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे.ही संपूर्ण घटना सिन्नरसह परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली असून तालुक्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.संपूर्ण जिल्ह्यात जवानाने अखेरच्या क्षणापर्यन्त दाखवलेली जिद्द अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *