जालन्यात आईदेखतचं तरण्याताठ्या मुलाचा वडिलांनीचं गळा दाबुन केली हत्या, आईनी ढसा-ढसा रडत सांगितलं कारण

जालना: दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात उघडकीस आली आहे. मुलाच्या हत्येनंतर घाबरलेल्या वडिलांनी आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेमुळे भोकरदन तालुक्यातील विझोरा गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.

आदित्य आढाव असे मृत मुलाचे नाव आहे. त्याला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्याने वडिलांना मारहाण केली होती.या भांडणाच्या रागात वडिलांनी (गजानन आढाव) यांनी आदित्यचा गळा दाबला. त्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला. घडल्या प्रकारामुळे वडील घाबरले. खुनाची घटना दाबण्यासाठी त्यांनी आदित्यने गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव रचला.

मयत आदित्य आढावने आई वडिलांशी वाद घातला. या वादाचे पर्यवसान आई वडिलांना मारहाणीत झाले. यानंतर आरोपी गजानन आढाव यांनी त्यांची संगीताबाई आढाव यांना घराबाहेर पाठवले. त्यानंतर घरात बाप मुलाचे जोरदार भांडणे झाले. संतापलेल्या वडिलांनी मुलाचा गळा आवळला. थोड्या वेळाने ते भानावर आले. मुलाच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे पाहून त्यांची पाचावर धारण बसली. स्वतः ला वाचवण्यासाठी त्यांनी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी गजाजन आढाव यांची चौकशी केली. आपणच आदित्यचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर मयताची आई संगिताबाई आढाव यांच्या तक्रारीवरुन वडील गजानन आढाव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *