जालन्यात बापानी मुलीच्या १३ वर्षीय मैत्रिणीची निर्घृण हत्य़ा करुन मृतदेह विहिरीत फेकला, कारण कळताचं गावकरी सुन्न

जालना-  दोन्ही मुली पळून गेल्याची माहिती गावात पसरेल, त्यामुळे समाजात बदनामी होईल म्हणून मैत्रिणीच्या वडिलांसह इतरांनीच पायल मच्छिंद्र जाधव (१३) या मुलीचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी बापासह पाच जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंभू सावरगाव येथील दोन मुली पळून गेल्या होत्या. एक मुलगी घरी परतली होती, तर एका १३ वर्षीय मुलीचा मृतदेह १६ एप्रिल रोजी विहिरीत आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी बुधवारी मृत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रात्री १२.३० वाजता घराबाहेर पडलेल्या दोन मुलींना भेटण्यासाठी शिवनी येथील तीन मुले आली होती.

त्यांच्यात वादही झाला होता. मुले येत नसल्यामुळे दोन्ही मुलींपैकी एका मुलीने शंभू महादेव येथील एका महाराजाच्या मोबाइलवरून फोन लावत मुलांना बोलावले. जालिंदर लक्ष्मण राठोड (शंभू सावरगाव), जीवन मोहन चव्हाण युवराज राम राठोड ( दोघे रा. राठोडनगर), अनिल सुरेश राठोड (डांबरी) यांच्यासह आपल्या मुलीची अल्पवयीन मैत्रीण यांनी बदनामीला घाबरून मुलीचा खून करत मृतदेह विहिरीत टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी संशयित आरोपी जालिंदर लक्ष्मण राठोड, जीवन मोहन चव्हाण, युवराज राम राठोड, अनिल सुरेश राठोड यांच्यासह एक मुलगी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पळून गेलेल्या विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या पुढील तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणातील तीन मुले पोलिसांच्या रडारवर आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *