जिच्यावर अंत्यसंस्कार घातला ति लेक झाली जिवंत, मुलीकडुन सत्य ऐकल्यावर पोलिसांचे उडाले हौश

पोलीस एखाद्या हत्या झालेल्या किंवा अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असतील आणि जर मृत व्यक्तीच समोर आली आणि म्हणाले,की मी जिवंत आहे तर काय होईल? मात्र अशीच एक घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रहिमापुरमध्ये बाकरपूर इथे घडली आहे.

एखाद्या चित्रपटाला शोभावे असे कथानक ह्या बातमीचे आहे.पोलीस ज्या तरुणीला मृत समजत होते आणि तिच्या खुनाचा शोध घेत होते तिनेच आता स्वतः जिवंत असल्याचे सांगितल्याने मग मृतदेह कुणाचा होता? हा नवीन शोध आता सुरु झाला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार,काही दिवसांपुर्वी वैशाली जिल्ह्यात एका तरुणीच्या घरच्यांनी लेकीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती.दुसऱ्या दिवशी पोलिसांना एका मुलीची बाॅडी सापडली.त्यावेळी या मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधुन समोर आले.चेहरा पुर्ण विद्रुप केलेला असल्याने बाॅडीची ओळख पटत नव्हती.

त्यामुळे हि तीच असावी अशा रीतीने पोलिसांनी नोंद केली.त्यानंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीच्या मारेकऱ्यांच्या शोध घ्यायला सुरुवात केली मात्र खुन का व कोणी केला? हे शोधण्यास पोलिसांना यश आले नाही.

दरम्यान ज्या मुलीवर घरच्यांनी अंत्यसंस्कार केले त्याच मुलीचा एक video व्हायरल झाला.’मी माझ्या मर्जीने घरातुन पळून जाऊन लग्न केले आहे असे या व्हिडीओमध्ये मुलीने सांगितले.माझ्या घरचे मुद्दाम खोटा गुन्हा दाखल करुन याला हत्येचं प्रकरण बनवतं आहे.एवढेच नाही तर तिच्या घरच्यांना तिने फोन करुनही जिवंत असल्याचे सांगितले होते.तरीसुध्दा त्यांनी गुन्हा दाखल केला.

हा video समोर आल्यानंतर आता पोलिसांसमोर वेगळाचं गुंता तयार झाला आहे.सध्या ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती कोण? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.आता पुन्हा संपुर्ण प्रकरणाच्या नव्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *