जेवणात मासिक पाळीचं रक्तस्त्राव मिसळुन पतीला खाऊ घालायची बायको, याच्यामागचं डोक चक्रावणारं कारण पतीना सांगितल

गाझियाबाद : उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली पत्नी जेवनामध्ये मासिक पाळीचा रक्तस्त्राव मिसळवत असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली आहे. या प्रकारामुळे आपल्याला गंभीर आजार झाल्याचे देखील त्याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने बायको आणि तिच्या आई-वडिलांविरोधात गाझियाबादच्या कवीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे मेडिकल अहवालाची मागणी केली आहे. त्यानुसार आता संबंधित प्रकाराच्या तपासासाठी चार सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवू अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पीडित व्यक्तीने आपला वैद्यकीय अहवाला पोलिसांकडे सादर केला आहे. त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, माझी बायको मला जेवनामधून मासिक पाळीचा रक्तस्त्राव देत होती. त्यामुळे माझ्या शरिरात इस्फेक्शन झाले. मी वारंवार आजारी पडत होतो. जेव्हा मी डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी माझ्या शरिराच्या अंतर्गत भागांवर सूज आल्याचे सांगितले. पोलिसांनी या व्यक्तीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पत्नी आणि तिच्या आईव-विडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जादू -टोण्याचा प्रकार असल्याचा दावा
संबंधित व्यक्तीचे 2015 मध्ये लग्न झाले होते. त्याची पत्नी वारंवार त्याला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळ राहण्यास सांगत होती. मात्र त्याची इच्छा नसल्याने त्यांच्यामध्ये वाद होत होते. या वादातूनच पत्नीने हा प्रकार केल्याता आरोप तक्रारदाराने केला आहे. पुढे त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, माझ्या पत्नीचे आईवडील तिला माझ्यावर जादू -टोला करण्यासाठी देखील प्रवृत्त करत होते. त्यातूनच तिने माझ्या जेवनामध्ये मासिक पाळीचा रक्तस्त्राव आणी विष मिसळवले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *